आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिशय उत्कंठेचा विषय:39 पैकी साडेसात किमी जलवाहिनी टाकली, 45 मीटर उंच जॅकवेलचे काम मार्चपासून सुरू

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगबादकरांसाठी अतिशय उत्कंठेचा विषय असलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेला अखेर काही प्रमाणात का होईना गती मिळालीआहे. न्यायालयाची सतत कानटोचणी, अधिकाऱ्यांचा पाठपुरावा, लोकप्रतिनिधींच्या बैठका आणि नागरिकांच्या दबावामुळे ठेकेदाराने अखेर हालचाल सुरु केली आहे. आता ३९ पैकी साडेसात किलोमीटर मुख्य जलवाहिनी टाकली आहे. ११ किलोमीटरच चर पाईपलाईनसाठी खाेदून ठेवले आहे. १३ किलोमीटर रेडिमेड पाईपलाईनची ऑर्डर दिली असून, एमबीआर आणि जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाला गती मिळाल्याचे पाहायला दिसतआहे.

मार्चपर्यंत शहरातील १० जलकुंभ तयार होतील, या आठवड्यात हिमायत बाग येथील सुमारे ४० लाख लिटर पाणी साठवण क्षमतेच्या जलकुंभाचा स्लॅब पडणार आहे. दररोज सरासरी ९६ मीटर पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. याच गतीने काम सुरू राहिल्यास ३९ किलोमीटरची पाइपलाइन सप्टेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल. तसेच, कॉपर डॅम तयार करण्याचे काम फेब्रुवारी अखेरीस पूर्ण होणार असून, त्यानंतर मार्चमध्ये जॅकवेलच्या कामास सुरवात होईल, असे नियोजन केले असल्याचे जीवन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अभियंता गजानन रबडे यांनी सांगितले.

हैदराबाद येथील जीव्हीपीआर कंपनीला या कामाचे कंत्राट िदले आहे. या कंपनीमार्फत काम संथगतीने सुरू असल्याची ओरड होती. न्यायालयाने देखील यावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर या कामाला गती मिळाली आहे. गुरुवारी अधिकारी, माध्यमांच्या प्रतिनिधींनी या कामाची पाहणी केली. या वेळी एमजीपीचे मुख्य कार्यकारी अभियंता गजानन रबडे, पीएमसीचे प्रमुख समीर जोशी यांची उपस्थिती होती.

जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाला देणार गती
नक्षत्रवाडी येथे जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरु आहे. या ठिकाणी ६ सीएलएफ (क्लरीफक्युलेटर) चे काम गेल्या महिन्याच्या तुलनेत गतीने सुरु आहे. सहा सीएलएफची क्षमता ३९२ एमएलडी (दशलक्ष लिटर) इतकी आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या सीएलएफची क्षमता सध्या अस्तित्वातील सीएलएफ पेक्षा अडीच पट जास्त आहे. डोंगरावर दोन संतुलित जलकुंभ बांधणार असून, त्यापैकी एकाचे काम पूर्ण झाले, तर दुसऱ्याचे देखील काही महिन्यात पूर्ण होण्याची होईल. संतुलित जलकुंभांच्या सहाय्याने औरंगाबाद शहराला कुठेही उपसा न करता पाणी मिळणार आहे.

३०० कामगार करतात रात्रंदिवस काम
कोर्टाच्या आदेशानंतर सुमारे ३०० कामगार रात्रंदिवस काम करत असल्याचे एमजीपीने सांगितले. पूर्वी जलवाहिनी टाकण्यासाठी ७ मशिनरी होत्या. सध्या १९ मशीनद्वारे काम सुरू आहे. पाइपचे जॉइंट जोडण्यासाठी पूर्वी ५ टीम होत्या, आता ९ टीम आहेत, असे रबडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...