आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफुलंब्री तालुक्यातील पेंडगावच्या सविता डकले या शेतकरी महिलेला स्वत: शेतात राबत दुष्काळी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना फायद्याच्या शेतीचे ऑनलाइन धडे देत आहेत. नैसर्गिक शेती, पिकांची निवड, शेतमालासाठी बाजारपेठेपर्यंतचे सखोल मार्गदर्शन त्या शेतकऱ्यांना करतात. फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी ही क्रांती लीलया करून दाखवली. यामुळे त्यांचे फेसबुक फॉलोअर वाढले असून जवळपास ७.५ लाख त्यांचे फॉलोअर्सवर आहेत. त्यांच्या या कार्याची दखल मेटा या कंपनीने घेतली. राजधानी दिल्लीत त्यांना बोलावून त्यांचा सन्मान केला.
केंद्र सरकारने नुकताच अर्थसंकल्प सादर केला. त्यात डिजिटल शेतीवर जोर दिला असून फुलंब्रीच्या या सावित्रीच्या लेकीने तर यावर २०१७ पासूनच चळवळ उभारली आहे. या चळवळीच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांनी प्रेरणा घेऊन आपली शेती फायद्याची केली आहे. केवळ शेतीच नव्हे, तर बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावरही त्यांनी खेडोपाडी जाळे तयार केले आहे.
लाेकांच्या टाेमण्यांकडे दुर्लक्ष करत प्रगती : शेतीकाम येत नाही, शिक्षण नाही, कापूस कसा वेचणार या विवंचनेत सविताताई लग्नानंतर गावातील लाेकांच्या टाेमण्यांकडे दुर्लक्ष करत काम करत राहिल्या. वुमन इन अॅग्रिकल्चर, अाॅनलाइन फार्मर आदी फेसबुक पेज सुरू केले आहे. त्यावरून सविताताई मार्गदर्शन करतात. त्यांचे फेसबुकवर सुमारे साडेसात लाख फाॅलाेअर्स आहेत. आज गावात १२ बचत गटांच्या माध्यमातून महिलांसह परिसरातील गावात शेतीविषयी महिलांना प्रशिक्षण देतात. सध्या त्या सेवा संस्थेसाठी मास्टर ट्रेनर म्हणून काम करतात.
शेतीच ठरली आधार
^काेराेनाकाळात पुणे, मुंबईसह बंगळुरूतील अनेकांच्या नाेकऱ्यांवर गदा आली. त्यांना थेट गावाकडे येत शेतीवर अवलंबून राहावे लागले. जेथे सर्वच मार्ग बंद हाेतात, तेथे शेतीकाम हाच पर्याय उरताे. तसेच एक महिला सक्षम झाली की ती कुटुंबालाच नव्हे तर समाजालाही दिशा देते.- सविता डकले, शेतकरी महिला.
नोकरी ही शेतीपेक्षा मोठी असू शकत नाही
सविताताईंची घरची परिस्थिती बेताचीच. घरी सव्वा एकर शेती असून पती शेती करतात मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागत नसल्याने त्या संसाराला हातभार म्हणून पतीसह शेतात काम करत असतात. शेतीपेक्षा काेणतीही नाेकरी माेठी नाही असा सविताताईंचा ठाम विश्वास आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.