आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:शहरातील 75% महिलांनी पाहिली नाही मुलींची पहिली शाळा

औरंगाबाद / रोशनी शिंपीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांना शिक्षणाची वाट खुली करणाऱ्या सावित्रीबाई फुलेंनी समाजाचा तीव्र द्वेष अंगावर घेतला. आज महिला विविध पदांवर दिमाखाने मिरवतही आहेत. मात्र, दिव्य मराठीने जेव्हा सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त प्रातिनिधिक सर्वेक्षण केले तेव्हा महिलांच्या जगण्याला अर्थ देणाऱ्या सावित्रीबाईंचा पुण्यातील वाडा ६४ टक्के महिलांनी पाहिलाच नसल्याचे वास्तव समोर आले. तर, ७५ टक्के महिलांनी मुलींची पहिली शाळाही पाहिली नाही. ६४ % महिलांनी पुण्यातील फुलेवाड्यास भेट दिलेली नाही. तर ६० % महिलांनी सावित्रीबाईंचे स्मारक पाहिलेले नाही.

सावित्रीबाईंकडून हे मिळाले विविध जाती-धर्मांच्या, वयोगट, स्तरातील महिलांशी दिव्य मराठीने संवाद साधला. त्यांना जयंतीनिमित्ताने ४ प्रश्न विचारले. या सर्वेक्षणात १२५ महिला सहभागी झाल्या. या पैकी ४२% महिलांनी सावित्रीबाईमुळे शिक्षण मिळाल्याचे नमूद केले. २४% महिलांनी आर्थिक स्वावलंबन, २०% आत्मभान तर १४ % महिलांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद मिळाल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...