आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​दत्तजयंती:3 अनाथाश्रमांतील 250 मुलांसह 750 भक्तांना महाप्रसादाचा लाभ

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दत्तजयंतीनिमित्त एन-७ भागातील श्री दत्तमंदिर समितीने सामाजिक बांधिलकी म्हणून शहरातील तीन बालिकाश्रमासह दत्तमंदिरात अन्नदान केले. तसेच मंदिर परिसरात १० हजार भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करून दत्तजयंती कार्यक्रमाची सांगता झाली. जागृत दत्तमंदिरातर्फे ९ दिवस महाप्रसादाचे आयोजन केले होते. शुक्रवारी समारोपानिमित्त सिडको एन-२ येथील मेघालय वस्तिगृहातील ३० मुलींना, भगवानबाबा बालिकाश्रमात दीडशे मुला-मुलींना, तर एन-४ येथील बालश्रमातील १०० मुलांना पुलाव, पुरी-भाजी, बालुशाही, गुलाबजाम देण्यात आले. दुपारी १२.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मंदिरासमोर भंडाऱ्याचे आयोजन केले. या वेळी ४ क्विंटल बुंदी, ६ क्विंटलच्या पुऱ्या, ३ क्विंटलच्या वांगे-बटाटे भाजी, ४ क्विंटलचा मसाले भात होता. १० हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतल्याचे गणेश जोशी यांनी सांगितले.

यज्ञ-आहुतीने सप्ताहाची सांगता : विठ्ठलनगर येथील मंदिरात १ डिसेंबरपासून मंडळ मांडणी व अग्निस्थापना करून गुरुचरित्र पारायण वाचनाने सुरुवात झाली. दररोज नित्य याग, स्वाहाकार व अखंड प्रहर झाले. सप्ताहकाळात गणेश याग, मनोबोध याग, गीताई याग, चंडी याग, श्री स्वामी याग रुजू केले. दीड हजार सेवेकऱ्यांनी आरती व प्रसादाचा लाभ घेतला. दत्तपूजन, देवता विसर्जन व अलंकार पूर्णाहुती करून महाराजांच्या चरणी सेवा रुजू केली. २ हजार भाविकांसाठी महाप्रसाद केला.

बातम्या आणखी आहेत...