आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहानगरपालिका कर, भाडेपट्टी आदी वसुलीमध्ये आतापर्यंत नेहमीच मागे राहिली आहे. मात्र, दुसरीकडे मनपाच्या सिद्धार्थ जलतरणिकेने चालू आर्थिक वर्षांत ७६,८९,९४० लाखांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. यंदा चालू आर्थिक वर्ष संपेपर्यंत मार्च महिन्याच्या सुरुवातीस सिद्धार्थ तलावाने आतापर्यंतचा विक्रमी आकडा गाठला आहे. खेळाडू, नागरिकांची सदस्य नोंदणी, जिम आणि स्पर्धेच्या माध्यमातून हे उत्पन्न मिळते.
हा तलाव २००० मध्ये सर्वसामान्यांसाठी सुरू झाला. सन २०१० पासून अभय देशमुख हे जलतरणिकेचे व्यवस्थापक झाल्यापासून तलावाच्या उत्पन्नात वाढ होत गेली. त्यांनी १ एप्रिल २०२२ ते १ मार्च २०२३ या आर्थिक वर्षामध्ये २०२२-२३ मध्ये ७६,८९,९४० विक्रमी उत्पन्न मिळवून दिले.
सुविधा, सुरक्षेवर भर दर्जेदार सुविधा आणि सुरक्षेवर भर यामुळे सध्या शहरातून हजारो जलतरणपटू येथे येत आहेत. आता बॅचसाठी प्रवेश सुरू आहेत. चांगल्या सुविधेमुळे आम्ही गेल्या १७ वर्षांतील सर्वाधिक उत्पन्न मिळवू शकलो आहोत. मनपा प्रशासक, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यांने चांगले काम सुरू असल्याचे जलतरण व्यवस्थापक अभय देशमुख यांनी म्हटले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.