आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धापन दिन:76 वर्षांच्या आजोबांनी जिंकली चालण्याची स्पर्धा

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसबीएच रिटायर्ड एम्प्लॉइज वेल्फेअर प्रतिष्ठानतर्फे निवृत्त सभासदांसाठी चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ८० ज्येष्ठांनी सहभाग नोंदवला. पुरुषांच्या बरोबरीने महिला स्पर्धकांचा उत्साह कायम होता. ८३ वर्षांच्या आजाेबांचा सहभाग लक्षवेधी ठरला.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव व संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त प्रतिष्ठानने ही स्पर्धा घेतली. सकाळी ६ वाजता हॉटेल अमरप्रीत चौकात संस्थाध्यक्ष प्रल्हाद बडवे यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात केली. ३ किलोमीटरचे अंतर सर्वच स्पर्धकांनी पार केले. यात ७६ वर्षांचे पद्माकर कुलकर्णी, ६८ वर्षांचे मनोहर वाकपंजर, ६३ वर्षांचे अजय कोटणीस, ७३ वर्षांचे काशीनाथ खरात, ६२ वर्षांचे अभयसिंग पवार, अतुल कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

द्वितीय क्रमांकावर ७५ वर्षांचे मोहंमद सिरजोद्दीन, ७२ वर्षांचे प्रेमचंद तुल्ले, ६६ वर्षांचे श्यामसुंदर मेढेकर, ६४ वर्षांचे प्रमोद तोरवी होते. महिला गटात ५५ वर्षांच्या स्नेहल आष्टूरकर यांनी बाजी मारली. ५९ वर्षांच्या मोहिनी कुलकर्णी दुसऱ्या ठरल्याा. स्पर्धकांना १५ ऑगस्ट रोजी बक्षीस वितरण करण्यात येईल. यासाठी बी. एम. कुलकर्णी, मंगेश देशपांडे, देगलूरकर, विनायक अभ्यंकर, प्रमोद बेंडे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...