आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंता मिटली:मराठवाड्यात असलेल्या 872 प्रकल्पांत 77 टक्के पाणीसाठा, अपेक्षित सरासरीच्या 130 टक्के पाऊस झाल्याने मिटली चिंता

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात २० ऑगस्टपर्यंत झालेल्या पावसामुळे ८७२ प्रकल्पांमध्ये ७७ टक्के पाणीसाठा झाला. विभागात २० ऑगस्टपर्यंत ५७० मिमी इतका पाऊस झाला आहे. अपेक्षित सरासरीच्या १३० टक्के पाऊस झाल्यामुळे धरण साठ्यात सातत्याने वाढ होत आहे. ८७२ प्रकल्पांत ६३०७ दलघमी इतका पाणीसाठा झाला असून हे प्रमाण ७७ टक्के इतका आहे.

मराठवाड्यात औरंगाबाद ४४५ मिमी पाऊस झाला असून अपेक्षीत सरासरीच्या (११९ टक्के) पाऊस झाला आहे. जालना ५२७ मिमी, बीड ४२७ मिमी, लातूर ५३१ मिमी, उस्मानाबाद ४६१ मिमी, नांदेड ८५४ मिमी, परभणी ५०५, हिंगोली ७१६ मिमी इतका पाऊस झाला आहे.जायकवाडी धरण सध्या ९५ टक्के भरले आहे. जायकवाडी धरणाचे दरवाजे तीन ऑगस्टपासून उघडण्यात आले आहेत. दरम्यान, मागील दोन महिन्यांपासून चांगला पाऊस होत असल्याने जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले होते. वरील धरणातून पाण्याची आवक कमी झाल्याने रविवारी (२१ ऑगस्ट) जायकवाडीचे १० दरवाजे बंद करण्यात आले. आठ दरवाजातूनही विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या ४ हजार १९२ क्युसेकने विसर्ग गोदावरी पात्रात सोडला जात आहे.

मध्यम प्रकल्पात ६८ टक्के पाणी
मराठवाड्यात ७५ मध्यम प्रकल्प असून या प्रकल्पात ६३८ दलघमी इतका पाणीसाठा झाला आहे. हे प्रमाण ६८ टक्के इतके आहे. ७४६ लघुप्रकल्पात ९७१ दलघमी इतका पाणीसाठा झाला असून हे प्रमाण फक्त ५८% इतके आहे. त्यामुळे अजूनही मध्यम आणि लघु प्रकल्पासाठी पावसाची आवश्यकता आहे.

बातम्या आणखी आहेत...