आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संचिका मंजूर:11 महिन्यांत गुंठेवारीच्या 7,766 संचिका मंजूर; 95 कोटींचे उत्पन्न

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाने डिसेंबर २०२० पर्यंतची बेकायदा बांधकामे गुंठेवारी अधिनियमांतर्गत नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मनपाने आतापर्यंत ७ हजार ७६६ फायली मंजूर केल्या आहेत. मंजूर काही फायलींबद्दल तक्रारी येत असल्याने नगररचना विभागाने मंजूर फायली मनपाच्या संकेतस्थळावर खुल्या केल्या आहेत. यातून मनपाला ९५ कोटी १५ लाख ६७ हजार ९१८ रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती नगररचना विभागाचे उपसंचालक ए. बी. देशमुख यांनी दिली. राज्य सरकारने गुंठेवारी भागातील मालमत्ता नियमित करण्यासाठी गुंठेवारी अधिनियमात सुधारणा करून ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या मालमत्ता नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. शासन आदेशानुसार मनपाने नियमितीकरणासाठीचे शुल्क रेडिरेकनर दरानुसार निश्चित केले. निवासी मालमत्तासाठी १५०० चौरस फुटांपर्यंत रेडिरेकनर दराच्या ५० टक्के शुल्क तर व्यावसायिक मालमत्तांसाठी संपूर्णपणे रेडिरेकनर दर आकारला जात आहे. अनेकांनी मुदतीत प्रस्ताव दाखल न केल्याने सूट हळूहळू कमी केली जात आहे. गुंठेवारी नियमितीकरणाला ११ महिने पूर्ण झाले असून केवळ ७ हजार संचिका नियमित झाल्या. प्रशासनाकडून गुंठेवारी नियमितीकरणाकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे कामाला गती मिळाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत मनपाने ७ हजार ७६६ फायली मंजूर केल्या आहेत. त्यातून सुमारे ९५ कोटी १५ लाख ६७ हजार ९१८ रुपयांचा महसूल मिळाला आहे. दरम्यान, गुंठेवारीच्या काही फायलींबाबत तक्रारी येत असल्याने संपूर्ण फायली मनपाच्या संकेतस्थळावर अपलोड केल्या आहेत. यात सुमारे ७ हजार फायलींचा समावेश असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

सातारा-देवळाईतून सर्वाधिक प्रतिसाद, १,०१३ संचिका प्रलंबित मनपाच्या गुंठेवारी कक्षाकडे ९ हजार २८६ संचिका प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ७ हजार ७६६ संचिका मंजूर केल्या असून ५०७ संचिका नामंजूर केल्या आहेत. १,०१३ संचिका प्रलंबित आहेत. या संचिका मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत आहे. सातारा-देवळाई वॉर्ड असलेल्या प्रभाग अ मधून गुंठेवारी नियमितीकरणासाठी सर्वाधिक ३९७२ संचिका दाखल झाल्या असून त्यापैकी ३१९१ संचिका मंजूर केल्या आहेत. सिडकोने झालर पट्टयासाठी तयार केलेल्या विकास आराखड्यातील आरक्षणे सातारा-देवळाईत टाकल्यामुळे २०८ संचिका नामंजूर केल्या आहेत. तर ५७३ संचिका प्रलंबित आहेत. या प्रभागातून ५४ कोटी ३३ लाख ८ हजार ७१८ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

बातम्या आणखी आहेत...