आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंताजनक:वाळूज परिसरातून कोरोना काळात 78 तर, कोरोना संपताच 2 वर्षांत 298 महिला बेपत्ता

संतोेष उगले | औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औद्योगिक वाळूज परिसरातून महिला-मुली बेपत्ता होण्याची कोरोना काळात अर्ध्यावर आलेली संख्या कोरोनाचे संकट संपत्ताच दुपटीने वाढली. मागील दोन वर्षांत तब्बल २९८ महिला बेपत्ता झाल्या. यात २५ ते ३५ वयोगटातील विवाहीत महिलांची सर्वाधिक संख्या आहे. बेपत्ता झालेल्या महिलांपैकी अद्यापही ८२ महिलांचा शोध लागलेला नाही हे विशेष.

वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यातील अधिकृत आकडेवारीनुसार जानेवारी २०१५ ते सप्टेंबर २०२२ या आठ वर्षांत ७९७ महिला बेपत्ता झाल्याची नोंद आहे. शिवाय समाजात बदनामी होऊ नये म्हणून, नोंद न करणाऱ्यांची आकडेवारी यापेक्षाही दुप्पट असण्याची शक्याता नाकारता येत नाही.

झपाट्याने वाढणारा परिसर म्हणून जशी वाळूजची ओळख आहे तशीच सर्वाधीक महिला पळून जाण्यासाठीसुद्धा वाळूज परिस कायमच चर्चेत राहतो. महिला-मुली बेपत्ता होण्याची कारणे जरी व्यक्तीपरत्वे भिन्न असली तरी, बहुतांश महिला-मुलींच्या घराबाहेर पडण्याच्या पद्धती, घर सोडल्यानंतर व घरी परत येण्यासाठी येणाऱ्या अडचणी आदींमध्ये बऱ्याचअंश साम्य आढळून येते. यासंदर्भात ‘दैनिक दिव्य मराठी’ने परतून आलेल्या बेपत्ता महिला, त्यांच्या पालकांशी संपर्क साधत, बेपत्ता होण्यामागची कारणे, त्यानंतर स्वत:सह परिवारातील सदस्यांच्या आयुष्यावर होणारा परिणाम, याबाबत जाणून घेतले असता पुढील प्रमाणे माहिती पुढे आली.

एक नजर बेपत्ता महिलांच्या प्रकरणावर

एक तरूण कामगार कामानिमीत्त वाळूज औद्योगीक परिसरात येतो. सर्वकाही सुरळीत सुरू असताना त्याच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्याचे निदर्शनास आले. याच दरम्यान कंपनीत कामावर जाणाऱ्या त्याच्या पत्नीचे प्रेमसंबंध सहकारी कामागारासोबत जुळले. त्यातूनच पती रूग्णालयात गेल्याची संधी साधून बेपत्ता झाली. पुढे आपण प्रियकरासोबतच राहणार असल्याची माहिती ती फोनवर पतीला देते. धक्कादायकबाब अशी की, १२ व ८ वर्षांच्या दोन मुलांना घरीच सोडून पसार झालेल्या आईचे काळीज मुलांच्या विणवणीनेसुद्धा पाझरत नाही. दोन्ही मुलांना व पतीला सोडून ती कायमची निघून जाते प्रियकरासोबत...‘त्या’ प्रियकरानेसुद्धा पत्नीला सोडून दिल्यानंतर हिच्याशी सुत जुळवले होते, त्यामुळे तो हिची कितपत साथ देणार? पुढे महिलेचे काय होणार? हे येणारा काळच ठरवेल.

एक दृष्टीक्षेप

- २५०० लहान-मोठे कारखाने, उद्योग वाळूज एमआयडीसी परिसरात आहेत.

- २५०००० एवढे लोक वाळूज परिसरात पोट भरण्यासाठी आले आहेत.

- कोरोना काळात मागील पाच वर्षांच्या काळात २०२० मध्ये सर्वात कमी ७८ महिला बेपत्ता झाल्या.

- कोरोनाचे संकट टळताच सन २०२१ मध्ये १४९ तर चालू वर्षात ऑक्टोबर पर्यंतच १४९ महिला बेपत्ता झाल्या आहे.

- जानेवारी २०२१ ते नोव्हेंबर २०२२ या काळात २९८ महिला बेपत्ता झाल्या. यातील ८२ महिलांचा तर,मागील आठ वर्षात बेपत्ता झालेल्या १८३ महिलांचा आद्याप शोध लागलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...