आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांचा मार्चअखेरपर्यंत होणार कायापालट:तीन हजार शाळांच्या वर्गखोल्या स्मार्ट करण्यासाठी 79 कोटींचा निधी मंजूर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थी गुणवत्ता आणि कौशल्य विकासासाठी विविध सुविधा असणे आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून समग्र शिक्षाअंतर्गत मार्च २०२३ पर्यंत ३,००० सरकारी शाळांमध्ये स्मार्ट क्लास (वर्गखोल्या) करण्यात येणार आहेत. त्यासाठी ७९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तसेच, ६४४ शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅबसाठी मंजुरी दिली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी दिली. शिक्षण विभागाच्या विविध बाबींचा आढावा घेण्यासाठी पगारे सोमवारी औरंगाबादेत आले होते. या वेळी प्रादेशिक विद्या प्राधिकरण येथे निपुण भारतअंतर्गत सुरू असलेले विविध उपक्रमबाबत चर्चा झाली. त्या वेळी ते बोलत होते. प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे संचालक डॉ. कलिमोद्दीन शेख, सहसंचालक प्रशांत महाबोले यांची उपस्थिती होेती.

पगारेे म्हणाले, कोरोनाकाळात माेठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले. ते विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले. मात्र, महाराष्ट्रात प्राथमिकची स्थिती चांगली आहे. आठवी ते दहावीच्या वर्गांवर जास्त प्रभाव दिसून येतो. त्यासाठी सर्व शाळांमध्ये ब्रिज कोर्सेस सुरू करणार असून, कोणत्या जिल्ह्यातील शाळा गुणवत्तेत कमी आहेत. त्याची माहिती घेऊन तिथे आवश्यकतेनुसार विविध उपक्रम राबवणार आहेत. काेराेनाकाळात नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यात अडचणी होत्या. परंतु, आता पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान, भाषाज्ञानावर अधिक लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

१५१० शाळांमध्ये संगणक समग्र शिक्षाअंतर्गत १५१० शाळांमध्ये संगणक लॅब करणार आहे. तीन हजार शाळांच्या स्मार्ट क्लाससाठी ७९ कोटी, तर ६४४ शाळांमधील अटल टिंकरिंग लॅबसाठी ६४ कोटी प्रति लॅब १० लाख रुपयांप्रमाणे तरतूद केल्याचेही पगारे यांनी सांगितले.

मिलिंद हायस्कूलला भेट छावणी परिसरातील मिलिंद मल्टिपर्पज हायस्कूलला त्यांनी भेट देऊन विद्यार्थी, शिक्षकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने शाळेला भेट दिली. शाळेतील अडचणी जाणून घेत आवश्यकतेनुसार मदत करू, असेही पगारे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...