आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीप्रश्न मिटला:मराठवाड्यात मोठ्या प्रकल्पांत 79% साठा, गेल्या वर्षीच्या तुलनेत 38 टक्के अधिक पाणी

प्रवीण ब्रह्मपूरकर |औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपासून सातत्याने होणाऱ्या पावसामुळे २५ जुलै रोजी मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत ७७ टक्के पाणीसाठा झाला आहे. हा गेल्या वर्षीच्या तुलनेत ३८ टक्के आधिक पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात ९० टक्के इतका साठा झाला आहे.

सध्या जायकवाडी धरणात ३६ हजार १२९ क्युसेक आवक येत आहे. मराठवाड्यात आतापर्यंत ४३९ मिमी पाऊस झाला आहे. अपेक्षित सरासरीच्या १५७ टक्के पाऊस झाला आहे. तर मराठवाड्याच्या वार्षिक सरासरीच्या ६४ टक्के पाऊस मराठवाड्यात झाला आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे.

जायकवाडीचा उपयुक्त पाणीसाठा १९५४.३५६ दलघमी : जायकवाडी धरणात सध्या येणारी ३६१२९ क्युसेक इतकी सुरू आहे. सध्या जायकवाडीचा पाणीसाठा ९० टक्के झाला. जायकवाडीचा उपयुक्त पाणीसाठा १९५४.३५६ दलघमी इतका आहे. सध्या नांदूर मधमेश्वरमधून २०७७६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. दारणातून ४३४० तर कडवातून १३९६, भंडारदरातून ६९९२ तर, निळवंडे प्रकल्पातून ५६१२ क्युसेक आणि देवगड बंधाऱ्यातून २५७८ क्युसेक विसर्ग सुरू आहे.

हिंगोली जिल्ह्यातील २६ पैकी २२ लघु तलाव भरले शंभर टक्के, सांडव्यावरून वाहत आहे पाणी दुधनात ७० टक्के पाणीसाठा दुधना धरणात सध्या १६७ दलघमी इतका पाणीसाठा झाला आहे. हे प्रमाण ६९.२५ टक्के इतके आहे. तर, येलदरी प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा ५२१ दलघमी असून हे प्रमाण ६४ टक्के इतके आहे. तर सिद्धेश्वर प्रकल्पात ५२ टक्के, तर आणि माजलगाव प्रकल्पात ४० टक्के इतका पाणीसाठा आहे. मांजरा प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा ६२ दलघमी असून ३५ टक्के पाणीसाठा झाला. तर ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पात ८३० दलघमी पाणीसाठा झाला असून ८६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मनार प्रकल्प शंभर टक्के भरले. निम्न तेरणा प्रकल्पात ६३ टक्के, विष्णुपुरी ७५ टक्के व सीना कोळेगाव प्रकल्पात सर्वात कमी १९ टक्के पाणीसाठा झाला आहे.

हिंगोलीत या वर्षी अतिवृष्टी
हिंगोली जिल्ह्यात पूर्णा पाटबंधारे विभागांतर्गत २६ पैकी २२ लघु तलाव शंभर टक्के भरले आहेत. या वर्षी अतिवृष्टीमुळे सध्याच्या स्थितीत वार्षिक सरासरीच्या ६२.२७ टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यात आतापर्यंत ५६० मिलिमीटर, कळमनुरी ६३८ मिलिमीटर, वसमत ५४७ मिलिमीटर, औंढा नागनाथ ४८६ मिलिमीटर, सेनगाव तालुक्यात ४२२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसामुळे लघु पाटबंधारे विभागाचे २६ पैकी २२ तलाव शंभर टक्के भरले आहेत. यामध्ये पारोळा, वडद, चोरजवळा, पेडगाव, हातगाव, सवाना, पिंपरी, बाभुळगाव, मरसूळ, वाळकी आदी तलावांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...