आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याचा विसर्ग:जायकवाडीच्या 25  दरवाजांतून 79000 क्युसेक विसर्ग

पैठणएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जायकवाडी धरणाच्या मुख्य दरवाजांतून गुरुवारी २.५ फूट उंचावून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. शुक्रवारी सायंकाळी आवक वाढल्याने यंदा पहिल्यांदाच २७ पैकी पाच आपत्कालीन दरवाजांसह २५ दरवाजे ४ फुटांनी उंचावून ७९ हजार १२४ क्युसेक विसर्ग गाेदावरीपात्रात सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती अभियंता विजय काकडे यांनी दिली. जायकवाडीचा पाणीसाठा सध्या ९८.३५ टक्क्यांवर आहे. शुक्रवारी सकाळी धरणाचे १० ते २७ असे १८ दरवाजे ३ फूट उंचीवरून ३.५ फूट उंचीवर स्थिर करण्यात आले होते. सायंकाळी ७.३० वाजेदरम्यान पाच आपत्कालीनसह २५ दरवाजे ४ फूट उंचावून नदीपात्रात ७९१२४ क्युसेक विसर्ग सुरू आहे.

शुक्रवारी दुपारी जायकवाडीचे १८ दरवाजे ४ फूट उंचावरून उघडण्यात आले होते. मात्र आवक वाढल्याने सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान ५ आपत्कालीनसह २५ दरवाजे उघडण्यात आले.

छाया : रमेश शेळके

बातम्या आणखी आहेत...