आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजैन महिला मंचेच्या वतीने सातव्या जैन एक्स्पोचे आयोजन 5 आणि 6 जानेवारीला करण्यात आले आहे. नवापूर येथील हिराचंद कासलीवाल मैदानावर एक्सपो होणार असून 75 हुन अधिक महिला उद्योजकांना यामध्ये संधी देण्यात आलेली आहे.
याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला जनमच्या संस्थापिका भारती बागरेच्या आणि अध्यक्ष मंगला पारख, करुणा साहूजी, मनीषा भन्साली, कविता अजमेरा उपस्थित होत्या.
बागरेच्या म्हणाल्या, पाच जानेवारीला सकाळी 11.25 मिनिटांनी सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा, लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील पोलिस उपयुक्त पर्णा गीते यांच्या उपस्थितीत एक्सपोचे उद्घाटन होईल. या ट्रेड फेअर मध्ये गृहपयोगी वस्तू तसेच संक्रांती करिता महिलांनी घरी बनवलेल्या आकर्षक वस्तूंचे प्रदर्शन पाहता येणार आहे.
खाद्यपदार्थ दाग दागिने कपडे गृह सजावटीच्या वस्तू बेडशीट वास्तुकला यासोबतच पापड कुरडई वडी बिस्कीट केक अशा विविध पदार्थांचे स्टॉल यामध्ये राहतील. 75 महिला उद्योजकांना या प्रदर्शनात संधी देण्यात आली आहे.
मुंबई पुणे हैदराबाद कन्नड जालना गुजरात नाशिक जळगाव धुळे आणि परभणी या ठिकाणी महिला उद्योजक सहभागी होत आहेत. जैन महिला मंचच्या वतीने वर्षभर विविध सांस्कृतिक आणि सामाजिक तसेच जनजागरण पर कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून महिला उद्योजकांना अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे असा याचा उद्देश आहे.
प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत खुले ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी प्रवेश ही मोफत आहे त्यामुळे शहरातील अधिकाधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन महिला उद्योजकांचा उत्साह वाढवावा असे आवाहनही बागरेच्या यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.