आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभागातील शिक्षक मतदारसंघातील विधान परिषद निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी ८ जणांनी अर्ज नेले आहेत. यात विद्यमान आमदार विक्रम काळे, प्रदीप सोळुंके यांच्या प्रतिनिधींनी अर्ज नेल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त जगदीश मणियार यांनी दिली.
आमदार काळे यांनाच राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपकडून देखील किरण पाटील यांना उमेदवारी जाहीर झालीआहे. गुरुवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. १२ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. १३ जानेवारीला अर्जाची छाननी हाेइल, १६ जानेवारीला अर्ज मागे घेता येणार आहे. ३० जानेवारीला मतदान असून, २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
विभागीय आयुक्तालयात विविध कक्षाची स्थापना : विभागीय आयुक्तालयात निवडणुकीसाठी विविध कक्षाची स्थापना करण्यात आली. यात उमेदवारी अर्ज घेण्यापासून ते आचारसंहितासह अनेक कक्ष स्थापन केले असून ५० अधिकारी-कर्मचारी काम पाहणारआहेत.
नियंत्रण कक्षात निवडणुकीसंदर्भातील मतदारांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी विभागीय स्तरावर २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नियंत्रण कक्षात ०२४०-२३४३१६४ हा दुरध्वनी क्रमांक व deg.aurangabad@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधता येइल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.