आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण मोहीम:शताब्दीनगर, रहेमानिया कॉलनीत 8 मुलांना गोवर ; मनपाच्या आरोग्य विभागाकडून तपासणी

औरंगाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई, भिवंडी, मालेगाव मनपा हद्दीत गोवर साथीचा उद्रेक झाला आहे. आता शहरातील नेहरूनगर आरोग्य केंद्रांतर्गत शताब्दीनगर, रहेमानिया कॉलनीत आठवडाभरापासून गोवर साथीची ८ संशयित बालके आढळून आली आहेत. त्यामुळे मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी बुधवारी स्वत: घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. ताे प्रामुख्याने पाच वर्षांखालील मुलांना हाेताे. शताब्दीनगर, रहेमानिया कॉलनीत मागील आठवड्यापासून आठ मुलांना गाेवर झाल्याचे समाेर आले. त्या मुलांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी मुंबई येथील हाफकिन प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

मनपा हद्दीत गोवरचा उद्रेक होऊ नये म्हणून आशा वर्कर्स घरोघरी जाऊन गोवर सर्वेक्षण करत आहेत. प्रत्येक संशयित रुग्णास जीवनसत्त्व अ चे दोन डोस देण्यात येत आहेत. विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र देऊन गोवर रुग्णांची माहिती द्यावी, असे कळवण्यात आले आहे. डॉ. मंडलेचा, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वेलन्स अधिकारी डॉ. मुजीब यांनी शताब्दीनगर, रहेमानिया कॉलनी येथील मुलांच्या तब्येतीविषयी विचारपूस केली. या वेळी डॉ. बाळकृष्ण राठोडकर, डॉ. उज्ज्वला भामरे, डॉ. मेघा जोगदंड उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...