आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जिल्हा परिषदेत गटांची संख्या 70 वर:8 गट आणि 16 गण वाढले; खुलताबाद, सोयगावमध्ये एकही गट वाढला नाही

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हापरिषदेत आता 8 गट वाढले आहेत. जिल्हा परिषदेत गटांची संख्या 70 झाली आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेत सिल्लोड मध्ये दोन गट वाढले आहेत. तर खुलताबाद आणि सोयगाव मध्ये एकही गट वाढलेला नाही अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

2011 च्या जनगनेनुसार गटांची वाढ करण्यात आली आहे. 2 जून रोजी प्रारूप प्रभागरचना अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्याधिकारी यांच्याकडे याबाबत हरकती व सूचना नोंदवता येणार आहे. हरकती आणि सूचना सादर करण्याचा कालावधी 2 ते 8 जून पर्यत असेल. या सूचना आणि हरकतींवर 22 जूनला विभागीय आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे.

अंतिम प्रभाग रचना 27 जून रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गटांची संख्या 70 आणि गण संख्या 140 झाली आहे. गणामध्ये 16 सदस्यांची संख्याही वाढली आहे.

बातम्या आणखी आहेत...