आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्तांकडून देणगी:नवरात्रात दोन रेणुका मंदिरांत 550 साड्यांसह 8 लाख दान

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावेळी शहरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. नऊ दिवस मंदिरांमध्ये भक्तांनी तोबा गर्दी केली होती, गरब्यातही तोच उत्साह होता. शहरातीलरेणुकामातेच्या दोन्ही प्रमुख मंदिरांत लक्षणीय दान जमा झाले. सिडको एन-९ येथील मंदिरात ६ लाख ९७ हजार रोख व ४२० साड्या अर्पण करण्यात आल्या. या साड्या भाविकांना विक्री करुन मंदिराला साडेतीन लाख रुपये प्राप्त झाले. तर बीड बायपास येथील रेणुका मंदिरात सव्वालाख रुपये व १३० साड्यांचे दान आले. याशिवाय दोन्ही मंदिरांत सव्वालाखाच्या घरात नारळही अर्पण करण्यात आले आहेत.

सिडको एन-९ मंदिराचे विश्वस्त सतीश वैद्य म्हणाले, अगदी छोट्याशा जागेत या मंदिराची सुरुवात झाली होती. हळूहळू मंदिराची महती पसरत गेली अन् दरवर्षी नवरात्रात व इतर उत्सवात भाविकांची संख्या वाढत गेली. शहरातील विविध भागांतून भाविक नवरात्रीत या मंदिराला आवर्जून भेट देतात. भाविकांच्या सहभागातून मंदिर विकासाचे कामही टप्प्याटप्प्याने केले जात आहे. नुकतीच आम्ही शेजारील जागाही विकत घेतली आहे. याठिकाणी आम्ही सामाजिक दायित्व जपणारे प्रकल्प राबवणार आहोत. त्यामुळे दानी भक्तांनी खुल्या हाताने दान करावे, असे आवाहनही केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या दानातूनच मंदिराच्या सामाजिक उपक्रमांची पायाभरणी होईल. हे उपक्रम शहरात भरीव योगदान देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मंदिरात आलेल्या साड्या आम्ही अल्पदरात श्रद्धाळू भाविकांना दिल्या आहेत. त्यातून मंदिराला साडेतीन लाख रुपये आले आहेत. ही रक्कमही प्रकल्पात वापरली जाईल.

भक्तांना साड्यांचा ‘प्रसाद’
बीड बायपास येथील मंदिरात सव्वालाखाचे दान आले आहे. तर १३० साड्याही देवीला दान करण्यात आल्या आहेत. या साड्या श्रद्धाळू भाविकांना अल्पदरात उपलब्ध करून दिल्या जातील. नवरात्रोत्सवात भाविकांसाठी मंदिर प्रशासनाने विविध उपक्रम घेतले. आगामी काळात सामाजिक दायित्व म्हणूूनही काही उपक्रम राबवले जातील.

बातम्या आणखी आहेत...