आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ:वाळूज येथील कंपनीत 8 लाखांची चोरी, माल घेऊन जाण्यासाठी कंपनीच्याच वाहनाचा वापर

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज औद्योगिक परिसरातील एसपी इंजिनिअरिंग वर्कस या कंपनीच्या सुरक्षारक्षक व कामगाराला दमदाटी करून कंपनीतील तब्बल 7 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना 14 जून रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या प्रकरणी कंपनी मालक संदीप भास्करराव पाटीलयांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. उल्लेखनीय बाब अशी की, चोरी केल्यानंतर चोरट्यांनी चोरीचे साहित्य घेऊन कसण्यासाठी कंपनीच्या आतील लोडिंग रिक्षाचा वापर केला.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप पाटील यांच्या मालकीची एच-62 सेक्टरमध्ये एस. पी. इंजनिरींग वर्कस ही कंपनी आहे. या कंपनीमध्ये तांब्याच्या वस्तूपासून ईलेक्ट्रोप्लेटींगला लागणारे जिक्सफिक्चर बनवण्याचे काम केले जाते. कंपनीत काम करणारा कामगार नितीन कुमार हा कंपनीच्या समोरील खोलीतच राहतो. तर, रात्रीच्या वेळी काशीनाथ इंगोले हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. दरम्यान 13 जून रोजी नियमितप्रमाणे रात्री काम आटोपल्यावर कंपनीचे शटर बंद करुन चावी सुरक्षारक्षक इंगोले यांच्याकडे देऊन घरी गेले.

शस्त्राचा दाखवला धाक

दुसऱ्या दिवशी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास तोंडाला बांधून चौघे चोरटे कंपनीत घुसले. यावेळी त्यांना इंगोले यांनी चौकशी करताच त्यांनी इंगोले व समोरच्या खोलीत असणारा कामगार नितीन कुमार या दोघांना धारदार शास्त्राचा धाक दाखवून एका खोलीत डांबून ठेवले. दोघेजण त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी तिथेच उभे राहिले. उर्वरित दोघांनी कंपनीच्या शटरची चावी हस्तगत करून कंपनीत प्रवेश करत आतील तांब्याच्या धातूच्या पट्टया, चौकोणी बार, बारीक चुरे, पाईप, धातूचे तयार मटेरील व काही नवीन माल कंपनीच्या आतील लोडिंग रिक्षात भरला.

चोरट्यांचा शोध सुरू

सदरील कंपनीमध्ये 15 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. यात चोरट्यांचे सर्व चित्रण झाले होते. मात्र, चोरट्यांनी जाण्यापूर्वी थेट डीव्हीआर बॉक्स तोडून तो सोबत घेऊन गेले. अंदाजे 25 ते 30 वर्षीय चोरटे परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याद्वारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम पोलिस निरीक्षक संदीप गुरमे हे करत आहे.

बातम्या आणखी आहेत...