आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक:पहिल्या दिवशी 8 जणांनी घेतले अर्ज, विभागीय आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभागातील शिक्षक मतदारसंघातील विधान परिषद निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्या नुसार उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी आठ जणांनी अर्ज नेले आहेत.यामध्ये विद्यमान आमदार विक्रम काळे यांच्या प्रतिनिधींनी अर्ज नेला आहे अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त जगदीश मणियार यांनी दिली आहे.

मराठवाड्यात शिक्षक मतदार निवडणुकीचे राजकीय वारे वहायला सुरुवात झाली आहे विद्यमान आमदार विक्रम काळे यांनाच राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याच

शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर भाजपकडून देखील किरण पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गुरुवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 12 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. 13 जानेवारीला अर्जाची छाननी करण्यात येणार असून 16 जानेवारीला अर्ज मागे घेता येणार आहेत तर तीस जानेवारीला मतदान असून 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

विविध कक्षाची स्थापना

विभागीय आयुक्तालयात निवडणुकीसाठी विविध पक्षाची स्थापना करण्यात आली आहे त्यामध्ये जवळपास 50 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे यामध्ये उमेदवारी अर्ज घेण्यापासून ते आचारसंहिता यासह अनेक कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

मतदाराच्या तक्रारीची दखल

निवडणुकीसंदर्भातील मतदारांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी विभागीय स्तरावर 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नियत्रंण कक्षात 0240-2343164 या दुरध्वनी क्रमांक व deg.aurangabad@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क करता येणार आहे. नियंत्रण कक्षात नियुक्त अधिकारी, कर्मचारी दुरध्वनीवर व व ई-मेलवर प्राप्त होणारे सर्व तक्रारी, संदेश स्वीकारतील व तात्काळ नोंदवहीत नोंद घेतील.

महत्वाचे व तात्काळ कार्यवाही करणे अपेक्षित असणाऱ्या संदेशाची माहिती दूरध्वनीवरुन वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेअसे विभागीय आयुक्त कार्यालयातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...