आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना टेस्ट:महिनाभरात चाचण्या वाढताच पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या प्रमाणात 8 टक्के वाढ

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • 31 ते 40 वयोगटातील रुग्णसंख्येचे प्रमाण 2.69 टक्के वाढले

मकरंद दंडवते 

राज्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने दिवसागणिक रुग्णसंख्येच्या प्रमाणातही वाढ होताना दिसत आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने मंगळवारी जारी केलेल्या अहवालामध्ये हे स्पष्टपणे समोर आले आहे. 
महिनाभरापूर्वी १२ एप्रिल रोजी जारी केलेल्या अहवालानुसार ३५ हजार ६६८ तपासण्यांमध्ये ९६ टक्के चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आढळून आले होते. पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण केवळ ४ टक्के होते. परंतु महिनाभरात चाचण्यांची संख्या वाढताच  पॉझिटिव्ह रुग्णांचे  हे प्रमाण तब्बल ८ टक्क्यांनी वाढले असल्याचे दिसून आले आहे. १२ मेपर्यंत  २ लाख २२,२८४ चाचण्यांच्या आधारे काढण्यात आलेल्या निष्कर्षांनुसार पॉझिटिव्ह रुग्णांचे  प्रमाण ४  वरून १२  टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

बातम्या आणखी आहेत...