आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापैठण रोडवरील शांती नर्सिंग होम येथे रविवारी ‘माणुसकीचा सोहळा’ हा कार्यक्रम पार पडला. या वेळी १ ते २१ वर्षांपर्यंत दारूच्या व्यसनापासून दूर राहिलेल्या ८० व्यसनमुक्तांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद येथील आयर्नमॅन नितीन घोरपडे उपस्थित होते. घाेरपडे यांनी स्वत: व्यसनाधीनतेपासून ते आयर्नमॅनपर्यंतचा प्रवास पार केलेला आहे. व्यसनमुक्तीच्या प्रवासात स्वत:ची जिद्द व पत्नीची साथ फार मोलाची असते, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शांती नर्सिंग होमच्या टीमने लिहिलेल्या “मद्यपाश’ या पुस्तिकेच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते झाले.
या वेळी व्यसनमुक्तांचा सपत्नीक सत्कार नितीन घोरपडे, शांती नर्सिंग होमचे संचालक डॉ. विनय बाऱ्हाळे यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. विनय बाऱ्हाळे यांनी “व्यसन : एक मानसिक आजार’ याविषयी माहिती दिली. डॉ. सोनाली देशपांडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शांती नर्सिंग होम व मित्र ग्रुपची ओळख सई चपळगावकर यांनी करून दिली. डॉ. श्रुती ढवळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुश्रूत पाटील यांनी आभार मानले. मित्र ग्रुपचे प्रमुख डॉ. विनायक पाटील, डॉ. चिन्मय बाऱ्हाळे, डॉ. निखिल खेडकर, डॉ. तेजस गयाळ, वैशाली दाभाडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दीपक फासाटे, शीतल सूर्यवंशी, आरुषी भोरकर, परिणिता खंडागळे, अनिल पवार, सचिन आव्हाड, सचिन गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.