आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारंपारिक वेशभुषेत रॅपलिंग:औरंगाबादच्या 12 महिलांचे नऊवारीत 80 फूट रॅपलिंग

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन कॅडेट फोर्स, देवगिरी स्पोर्ट््स अकादमी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहसी उपक्रमात औरंगाबाद लेणी येथे ४५ महिला व मुलींनी पारंपारिक वेशभुषेत रॅपलिंगचा आनंद घेतला. यापैकी १२ महिला तर चक्क नऊवारी नेसून या चित्तथरारक उपक्रमात सहभागी झाल्या हाेत्या. सर्व महिला दाेरीच्या साह्याने सुमारे ८० फूट खाली उतरल्या.

कमांडर विनोद नरवडे, नीलम नरवडे, जगदीश खैरनार, विजय पाटील,
निलेश लकडे, पंकज आव्हाळे, सुरेश भापकर यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली महिलांनी रॅपलिंग केले. याप्रसंगी डीएसअो कविता नावंदे, पूनम नवगिरे, पद्मावती धारवाडकर, सुरेखा उमदे, सीमा खोब्रागडे, ज्योती पुरी, शीला काथार यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...