आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवेळी झोप:चाळिशीतील 80 टक्के नागरिकांना अवेळी झोप, जेवणामुळे बीपी, शुगर

औरंगाबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनियोजित राहणीमान, अवेळी झोप, जेवणामुळे चाळिशीतील ८० टक्के जणांना बीपी, शुगर असल्याचे अाढळून आले आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील दुर्गाेत्सव मंडळांनी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये नेत्र, दंत तपासणीसोबतच सर्व आजारांच्या तपासण्या करण्यात आल्या. या वेळी समोर आलेल्या आकडेवारीतून दोन्ही आजार सर्वाधिक असल्याचे दिसले.

नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील मंदिरात पाठ, पूजन, भजनाचे कार्यक्रम होत आहेत. मात्र, आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती असल्याने सामाजिक दायित्व म्हणून आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन मंदिरात करण्यात आले हाेते. विष्णुनगरातील जयदुर्गा माता आणि मिटमिटा येथील मच्छिंद्रनाथ मंदिरात शिबिरे घेण्यात आली. यात दंत, नेत्र तपासणीच्या तुलनेत मधुमेह, रक्तदाब असलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे आढळून आले.

जयदुर्गा माता मंदिराच्या वतीने आरोग्य शिबिरासह कोविड बूस्टर डोस शिबिर घेण्यात आले. याठिकाणी दंतरोग शिबिरात १८, नेत्र तपासणी शिबिरात २५ जणांची तर शुगर आणि बीपीच्या आजाराची ६० जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३८ जणांना शुगर १५ जणांना रक्तदाब असल्याचे निदान झाले. या वेळी ६५ जणांना कोविड बूस्टर लस देण्यात आली. मंदिराचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब खरात यांच्या मार्गदर्शनाली डॉ. प्रशांत खरात, डॉ. अजय गुजराती, डॉ. किरण घुले, डॉ. योगेश तळेकर, अरुणा काथार, रेश्मा मोहिते, अनिता बनसोड आणि लक्ष्मी वर्मा यांनी सहकार्य केले.

मिटमिट्यात झाली १२२ जणांची तपासणी
मिटमिटा येथील मच्छिंद्रनाथ मंदिर परिसरातील सप्तशृंगी माता मंदिरात डाॅ. हेडगेवार रुग्णालयाच्या सहकार्यातून शिबिर झाले. दिवसभरात १२२ जणांची तपासणी करण्यात आली. डॉ. अप्पा कुलकर्णी, डॉ. मुकेश रोढी, डॉ. जयदत्त दळवी यांनी तपासणी केली. शिबिरासाठी डॉ. पार्थ रत्नपारखी, रंभाजी धोंडरे पाटील, सुभाष गायकवाड यांनी सहकार्य केले.

चाळिशीपार लोकांमध्ये बळावले आजार
अनियोजित राहणीमान, अवेळी झोप यातून बीपी, शुगर होत आहे. आतापर्यंत विविध ठिकाणी पाच शिबिरे झाली. यातही ४० वर्षांवरील नागरिकांमध्ये हे आजार अाढळून आले आहेत. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये दोन्ही आजारांचे प्रमाण अधिक आहे. डॉ. अप्पा कुलकर्णी, डॉ. हेडगेवार रुग्णालय