आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:80 कार्यकर्त्यांनी केली 50 खोक्यांवर घोषणाबाजी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उद्धव सेनेला पाठबळ

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महागाई वाढत असताना शिंदेसेनेचे आमदार ५० खोके घेऊन उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करतात, असा आरोप करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (१ सप्टेंबर) रोजी क्रांती चौकात राज्य सरकारविरोधी आंदोलन केले. त्यात सुमारे ८० जण सहभागी झाले होते. त्यांनी ‘५० खोके, महागाई ओके’, ‘हटा दो मोदी सरकार’ अशा घोषणा दिल्या. महाविकास आघाडीतील उद्धव सेनेला या आंदोलनातून बळ देण्याचा प्रयत्न झाला, असे दिसले.

प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष डॉ. मयूर मोहनराव सोनवणे, कार्याध्यक्ष कय्युम शेख यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. गुवाहाटी येथील रेडिसन ब्ल्यू हॉटेलसमोरील झाडे आणि डोंगराचे चित्र काढून देखावा सादर करण्यात आला. या वेळी शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला, प्रदेश सचिव अरुण अजबे, पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तर्माले, अनुराग शिंदे आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...