आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालतादीदींच्या जुन्या गाण्यांच्या आठवणींना उजाळा देत शीतल रुद्रवार यांनी सादर केलेल्या ‘धीरे धीरे चल...’, ‘बाहर से कोई अंदर...’, ‘बागों में बहार है...’ अशा विविध गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमात आकर्षण ठरले ते पुण्याचे ८० वर्षीय अनिल गोडे यांचे अॅकाॅर्डियन वादन.
भानुदास चव्हाण सभागृहात स्वयं फाउंडेशन, सरताज म्युझिकल ग्रुपतर्फे भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांना स्वरांजली अर्पण करण्यात आली. या वेळी शहरातील आजी-आजोबांसाठी हक्काचे व्यासपीठ असलेले स्वयम फाउंडेशनचे ‘क्या जमाना था’ या मंचाचे उद्घाटन आमदार संजय शिरसाट, अरविंद जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. ‘ओन्ली लतादीदी’ कार्यक्रमातील गाण्याची सुरुवात शीतल रुद्रवार यांनी ‘ये समा...’ या गाण्याने केली. मृणाली वेहोणे यांनी ‘ये दिल और उनकी...’ तर रफी हबीब आणि मृणाली यांनी ‘धीरे धीरे चल...’, ‘अगर तुम ना होते...’, ‘बाहर से कोई अंदर...’ यासोबतच ‘बागों में बहार है...’, ‘गाता रहे मेरा दिल...’, ‘बनके पंछी...’ अशा विविध गीतांना रसिकांनी दाद दिली. या वेळी मातोश्री वृद्धाश्रमातील ५० आजी-आजोबांची उपस्थिती होती. ‘क्या जमाना था’ची सदस्य नोंदणी सुरू झाली असून लवकरच आजी-आजोबांसाठी कार्यक्रम घेणार असल्याचे प्रेषित रुद्रवार यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.