आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बर्ड फ्ल्यू:परभणीत 80 हजार कोंबड्या मारणार, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदारांनी दिली माहिती

परभणी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • परभणीमध्ये बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला आहे.

परभणीमध्ये बर्ड फ्ल्यूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. येथे 800 कोंबड्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यानंतर परभणीतील 80 हजार कोंबड्या मारण्यात येणार आहे, असं राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सांगितले आहे. यासोबतच पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यातील 6 जिल्ह्यांना याचा धोका असणार आहे.

सुनील केदार यांनी पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. परभणीमध्ये बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच आम्ही कोंबड्यांचे सँपल भोपाळला पाठवले होते. त्याचा अहवाल आता समोर आला आहे. यामध्ये कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील अनेक परिसर सील करण्यात आले आहेत असेही केदार यांनी सांगितले आहे.

कोंबड्यांना कशा प्रकारे मारणार?
बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 80 हजार कोंबड्यांना मारले जाणार आहे. कोंबड्या मारण्यासाठी पाच फुटांचा खड्डा खोदला जाईल. यामध्ये केमिकल्स टाकून कोंबड्या मारण्यात येणार असल्याीच माहिती आहे. तसेच नागपूर, लातूर, अमरावती, परभणी, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील कोंबड्यांचे सँपल्स तपासणीसाठी पाठवले आहेत. या जिल्ह्यातही कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झाल्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...