आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रशासनाच्या वतीने २५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत विनाअपघात बससेवा केलेल्या चालकांची माहिती मागवली होती. त्यानुसार ८१० चालकांची यादी जाहीर झाली आहे. त्यापैकी ३० चालकांचा रा.प.महामंडळाच्या अमृतमहोत्सवदिनी १ जून रोजी गौरव करण्यात आला होता. उर्वरित ७८० चालकांचा २६ जानेवारी रोजी सपत्नीक गौरव होणार आहे. या सर्वांना प्रत्येकी २५ हजार रुपये रोख बक्षीस दिले जाईल. त्यामध्ये औरंगाबाद शहर जिल्ह्यातील २८ जणांचा समावेश आहे.
एसटी महामंडळातील बसचालकांनी विनाअपघात सुरक्षित बस चालवावी. प्रवाशांची सुरक्षा अबाधित ठेवून त्यांचा विश्वास दृढ करावा. जे चालक याचे काटेकोरपणे पालन करतील, त्यांचा सन्मान करण्यासाठी महामंडळ संचालक मंडळाच्या ३०१ व्या बैठकीत २७ जून २०२२ रोजी बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार विनाअपघात सेवा देणाऱ्या चालकांची आगराप्रमुखांकडून माहिती मागवण्यात आली होती. २३ जानेवारी २०२३ रोजी ७८० चालकांची यादी जाहीर करण्यात आली. या सर्वांचा विभागीय कार्यालयाच्या वतीने ध्वजारोहणानंतर गणराज्य दिनानिमित्त सन्मानित करण्यात यावे, असे आदेश वाहतूक महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी सर्व विभागप्रमुख, आगारप्रमुखांना दिले आहेत.
असे आहे बक्षिसाचे स्वरूप रोख पंचवीस हजार रुपये, सन्मानपत्र, २५ वर्षं विना अपघात सेवेचा बिल्ला, स्मृतिचिन्ह, सपत्नीक सत्कार, गौरवपात्र चालकांच्या पत्नीस साडी व खण देण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.