आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादसरा-दिवाळीनंतर ऊसतोड मजूर, कामगार मुला-बाळांसह स्थलांतरित होतात. या ८२ मुलांना शिक्षण विभागाने ४० दिवसांनंतर पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. या विद्यार्थ्यांना शहरालगतच्या १५ किलोमीटरजवळील वडगाव कोल्हाटी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश दिल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे.
शिक्षण विभागाने बालरक्षक मोहीम मुलांसह स्थलांतरित होणाऱ्या पालकांसाठी सुरू केली आहे. यात औरंगाबादमधील शिक्षक आणि बालरक्षकांनी पुणे व नगर जिल्ह्यातील विविध ऊसतोडणीच्या ठिकाणी स्थलांतरित झालेल्या बालकांचा शोध घेतला. यात जिल्हा परिषदेत ३६ आणि वडगाव कोल्हाटीच्या शिक्षकांनी परराज्यातून स्थलांतरित झालेले ४६ अशा एकूण ८२ मुलांना प्रवेश दिला आहे.
या मुलांचे शैक्षणिक नुकसान नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यात तीन ते अठरा वयोगटातील मुलांचा शोध घेण्यात येत आहे. या हंगामी स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत शिक्षण विभागामार्फत सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत नेवासा तालुक्यातील मंगळापूर येथील ८, घोगरगाव, काष्टी व श्रीगोंदा तालुक्यातील चिंगळा येथील २० व नेवरगाव येथील ८ असे एकूण ३६ विद्यार्थी बालरक्षक पथकाला परत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास यश मिळाले. या पथकात शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, गटशिक्षणाधिकारी एस. एम. गंडे यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षकांचा समावेश होता. मुलांच्या प्रवेशासाठी मुख्याध्यापक सुनील चिपाटे, सचिन वाघ, विद्या सोनोने, सोनाली निकम, मंगला गाडेकर, सुवर्णा शिंदे, अनिता राठोड आदींनी परिश्रम घेतले. यात राजकोट, सुरत, लखनऊ या राज्यातून, तर जालना, परभणी, बीड, बुलडाणा आणि जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड, सिल्लोड, वैजापूर तालुक्यातील बालकांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.