आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराद इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या माध्यमातून आयसीएआय औरंगाबाद विकास शाखेच्या वतीने आयसीएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुरुवारी (२ फेब्रुवारी) केंद्रीय परिषद सदस्यांच्या हस्ते ८४ नवीन चार्टर्ड अकाउंटंट्सचा सन्मान करण्यात आला.
बीड बायपास येथे झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष देबाशीष मित्रा, उपाध्यक्ष अनिकेत तलाठी यांच्या सत्काराने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाखा अध्यक्ष योगेश अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नव्याने सीए म्हणून पात्र ठरलेल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सीएच्या नवीन अभ्यासक्रमाबद्दल तसेच नवनवीन तंत्रज्ञानानुसार स्वत:मध्ये बदल करून घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या क्षेत्रात नव्याने पदार्पण करणाऱ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन मान्यवरांनी केले. सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. सीए गणेश भालेराव व इतरांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.