आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि उस्मानाबाद उपपरिसरातील शैक्षणिक विभागांत तासिका तत्वावर अध्यापनासाठी 16 जुलै रोजी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. 264 जागांसाठी 20 जुलैपर्यंत पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले होते.
नेट-सेट, पीएचडी अहर्ताप्राप्त असलेल्या 846 उमेदवारांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अर्ज सादर केले होते. लवकरच प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे. उस्मानाबाद आणि विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात सर्वाधिक 25 तर वनस्पतीशास्त्र विभाग-14 तर व्यवस्थापनशास्त्र विभागात 12 जागा आहेत. सामाजिक आरक्षणानुसार या जागा लवकरच प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
राज्यातील सर्व प्रादेशिक अकृषी विद्यापीठांत 1572 पैैकी 629 सहायक प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यास राज्य शासनाने अनुमती दिली आहे. डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 127 पैकी 77 सहायक प्राध्यापकांच्या जागा भरण्यात येणार आहेत. तत्पूर्वी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी तासिका तत्वावर अध्यापक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
सलग दुसऱ्या वर्षी थेट मुलाखतीद्वारे केंद्रीय पद्धतीने ही पदभरती केली जाणार आहे. विशेष म्हणजे, सामाजिक आरक्षणानुसार उमेदवारांची निवड होणार आहे. अनुसूचित जाती-35, अनुसूचित जमाती-19, व्हीजे (ए)-8, एनटी (बी)-7, एनटी (सी)-9, एनटी-(डी)-5, एसबीसी-5, ओबीसी-50, आर्थिक दृष्ट्या मागास (ईडब्ल्युएस)-26, सर्वसाधार प्रवर्ग-100 प्रमाणे उमेदवारांना संधी दिली जाईल. उस्मानाबाद उपकेंद्रात 39 जागा भरण्यात येतील. त्यामध्ये रसायणशास्त्र-13, व्यवस्थापनशास्त्र-8, एमसीए-3, एमबीए-5, इंग्रजी-1, शिक्षणशास्त्र-4, गणित-3, नाट्यशास्त्र-2 या विषयांचा समावेश आहे.
व्यवस्थापनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्रात सर्वाधिक सीएचबी-
मराठी-2, हिंदी-4, फ्रेंच-1, उर्दू-2, पाली अँड बुद्धीझम-2, राज्यशास्त्र-4, इतिहास-1, ग्रंथालय व माहितीशास्त्र-2, जीव रसायनशास्त्र-3, वनस्पतीशास्त्र-14, पर्यावरणशास्त्र-3, गणित-4, सांख्यिकीशास्त्र-4, उदारकला-2, पुरातत्वशास्त्र-6, शारीरीक शिक्षणशास्त्र-3, पर्यटन प्रशासनशास्त्र-6, विधी-8, शिक्षणशास्त्र-4, सुक्ष्मजीवशास्त्र-4, जैवतंत्रज्ञान-4, वॉटर अँड लँड मॅनेजमेंट-2, फाईन आर्ट्स-5, भुगोल-4, नॅनो टेक्नॉलॉजी-2, योगा-6, इलेक्ट्रॉनिक्स-3, फॉरेन्सिक सायन्स-4, पॉल हर्बट सेंटर अँड डीएनए-1, फुले-आंबेडकर थॉट्स-3, समाजकार्य महाविद्यालय-5, प्री-आयएएस कोचिंग सेंटर-10, संगीत-3, दिन दयाल उपाध्यय कौशल केंद्र (डीडीयुकेके)-४, रसायणशास्र-१२, प्राणीशास्र-२, व्यवस्थापनशास्र-12, भौतिकशास्र-10, केमिकल टेक्नॉलॉजी-10, मराठी, हिंदी, इंग्रजी, संगीत नृत्यशास्त्र यांचे प्रत्येकी एक, नाट्यशास्र-2, जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभाग-7, मानसशास्त्र-8, प्रीटिंग टेक्नॉलॉजी-8 लोकनेते गोपीनात मुंडे नॅशनल रूरल रिसर्ट डेव्हलपमेंट (जीएमएनआरडी)-8, समाजकार्य-1, ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र-2, वाणिज्य, रूरल मार्केटिंग मॅनेजमेंट, अॅग्रीकल्चर इकॉनॉमिक्स, पर्यावरणशास्र, प्राणीशास्त्र, फुट टेक्नॉलॉजी, संगणक व माहिती तंत्रज्ञानशास्त्रातील प्रत्येकी एक अशा 8 जागा आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.