आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तासिका तत्त्वावर अध्यापन:‘सीएचबी’ प्राध्यापकांच्या 264 जागांसाठी 846 उमेदवार स्पर्धेत

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि उस्मानाबाद उपपरिसरातील शैक्षणिक विभागांत तासिका तत्त्वावर अध्यापनासाठी १६ जुलै रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. २६४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून २० जुलैपर्यंत अर्ज मागवले होते. नेट-सेट, पीएचडी अर्हताप्राप्त ८४६ उमेदवारांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अर्ज सादर केले होते. सामाजिक आरक्षणानुसार या उमेदवारांच्या ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष मुलाखती घेण्याची शक्यता आहे.

उस्मानाबाद आणि विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात सर्वाधिक २५ तर वनस्पतीशास्त्र -१४, व्यवस्थापनशास्त्र-१२ जागा आहेत. राज्यातील सर्व प्रादेशिक अकृषी विद्यापीठांत १५७२ पैकी ६२९ सहायक प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यास राज्य शासनाने अनुमती दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १२७ पैकी ७७ सहायक प्राध्यापकांच्या जागा भरणार आहेत. तत्पूर्वी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी तासिका तत्त्वावर अध्यापक घेण्याचा निर्णय घेतला आहे. सलग दुसऱ्या वर्षी मुलाखतीद्वारे केंद्रीय पद्धतीने ही पद भरती होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...