आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:अकरावीचे विज्ञान-वाणिज्यला 85, तर कला शाखेला 15% प्रवेश

विद्या गावंडे|औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकरावीची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. यात दहावीला मिळालेल्या गुणांच्या आधारे विज्ञान किंवा वाणिज्य शाखेला ८० ते ८५ टक्के प्रवेश झाले आहे. मात्र, कला शाखेला कमी प्रतिसाद मिळत असून केवळ १० ते १५ टक्केच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा याबाबत घरात, नातेवाइकांसाेबत चर्चा सुरू हाेते. तसेच विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार शाखेची निवड केली जाते. काेराेनामुळे शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. गेल्या वर्षी परीक्षा न घेता मूल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर केला. ज्यात गुणांचा फुगवटा वाढला असून ८० ते ९०, ९५ टक्के गुण मिळाले. आजही विद्यार्थ्यांची आवड लक्षात न घेता दहावीच्या प्राप्त गुणांनुसार इंजिनिअरिंग, मेडिकल शाखेला प्रवेश घेण्याचे ठरवले जाते. त्यामुळे विज्ञान, वाणिज्य शाखेला ८० ते ८५, तर कला शाखेत १० ते १५ टक्के प्रवेश झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पालकांनी काळजी घ्यावी
कला शाखेला कमी प्रतिसाद आहे. केवळ १० टक्के प्रवेश झाले आहेत. मेडिकल, इंजिनिअरिंगलाच जाण्याच्या भावनेतून हे प्रवेश होतात. पालक आणि विद्यार्थ्यांनी शाखा निवडताना काळजी घ्यावी. शेजारचा प्रवेश घेतो म्हणून मीदेखील त्या शाखेला प्रवेश घ्यावा, असे शाळांत होणाऱ्या कलचाचणीतून दिसते. -एम. के. देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी

पालकांचा क्षमतेपेक्षा गुणांवर विश्वास
इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या तुलनेत कला शाखेला प्रतिसाद कमी आहे. याला गुणांचा फुगवटा कारणीभूत आहे. पालकदेखील प्राप्त गुणांवर विश्वास ठेवताे. परंतु, मुलांच्या आवडीनिवडी आणि क्षमतेवर नाही. कला शाखादेखील करिअरसाठी चांगली आहे.-एन. जी. गायकवाड, उपप्राचार्य, देवगिरी महाविद्यालय

बातम्या आणखी आहेत...