आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैष्णवी गटाचे सादरीकरण:बूस्टर डोसपासून 85 % लोक दूर; मंगळागौरी गीतातून लसीचा आग्रह

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाविरोधी लढाईत लसीची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र अजूनही औरंगाबाद शहरात बूस्टर डोससाठी पात्र असलेल्या ११ लाख ७० हजारपैकी ८५ % लोक अजूनही लस घेण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाहीत. प्रशासनाने वारंवार प्रयत्न केला तरी त्याला यश येत नाही. या पार्श्वभूमीवर काही महिला मंडळांनी मंगळागौरी कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे.

बूस्टर डोस टाळू नका, स्वस्थ राहा मस्त राहा…‘ असे गाण्यांमधून आवाहन करण्यात आले. झिम्मा, फुगडीचा खेळही रंगला. त्यांचा पहिला कार्यक्रम कामगार चौकातील पालखी हॉटेलमध्ये झाला. घागर घुमू दे घुमू दे.. म्हणत सर्वांनी नृत्य केले. फुगडीचे विविध प्रकार सादर करुन उपस्थितांकडून दाद मिळवली. पुष्पा चित्रपटातील ‘तेरी झलक अशरफी’ गीतावर सादरीकरणाचेही कौतुक झाले. आरती पाठक, पूजा कुलकर्णी, रत्ना खनाळे, प्रिया कुलकर्णी, सारिका वाटेगावकर, सुजाता नाईक यांचा सहभाग होता. स्वाती कुलकर्णी, स्वप्ना कार्लेकर यांनी गायन, भावना कुडे हिने निवेदन, रमाकांत शेजूळ यांनी ढोलकीवर साथ दिली.

महागाईकडे वेधले लक्ष
महागाई वाढते याचा सर्वाधिक परिणाम महिलांवर होतो. याचाच विचार करून भाजी, गॅस, वीज, पेट्रोल यांच्या वाढत्या किमतींवर कलावंतांनी लक्ष वेधले. महागाई रोखणे आपल्या हाती नाही, पण कुटुंबाची घडी बसवण्यासाठी अनेक ठिकाणी बारकाई केल्यास महागाईतही चांगला संसार करू शकतो, असा संदेश वैष्णवी गटाने दिला.

पारंपरिक गीतांच्या चालीवर नवे प्रश्न उलगडले
पारंपरिक गीतांच्या चाली ठेवून खेळ, वारसा जपणे, मनोरंजन करणे , आजच्या प्रश्नांवर उपस्थितांना विचार करण्यास भाग पाडणे असा उद्देश आहे. सादरीकरणानंतर फीडबॅकमुळे जेव्हा पेरलेल्या संदेशांचा उल्लेख होतो, ही बाब आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची असते.
- भावना कुडे, सादरकर्ती वैष्णवी गट

बातम्या आणखी आहेत...