आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबँकेतून काढलेली रक्कम घरी नेताना आरोपींनी जमिनीवर २० रुपये टाकून फॉर्च्युनर कारमधून ८५ हजार रुपये असलेली बॅग लंपास केली. कुख्यात बॅग लिफ्टिंग गँग शहरात सक्रिय झाल्याचे यावरुन स्पष्ट झाले आहे. मूळ भोपाळची कशिश मारिया वडील राहुल यांच्यासोबत वेदांतनगरात आजी-आजोबांकडे आली. १ ऑगस्ट रोजी कशिश व तिचे वडील फॉर्च्युनर गाडीने बन्सीलालनगरच्या एसबीआय बँकेत गेले. सकाळी ११.३० वाजता ८५ हजार रुपये काढून ते गाडीजवळ आले. राहुल यांनी गाडी सुरू करताच त्यांना एकाने जोरात आवाज देत तुम्हाला बँक मॅनेजर बोलावत असल्याचे सांगितले. त्यामुळे ते खाली उतरून आत गेले. तेवढ्यात दुसऱ्या व्यक्तीने कशिशला मॅडम, तुमचे पैसे खाली पडले, असे सांगितले. त्यामुळे कशिश खाली उतरली. तेव्हा २० रुपयांची नोट होती. ती आपली नाही म्हणून ती पुन्हा गाडीत बसली. तोपर्यंत वडीलही आले होते. पण तेवढ्या वेळेत आरोपींनी पैसे पळवले.
फुटेज गाेळा करणे सुरू
गाडी सुरू करून बाप-लेक हॉटेल विट्सपर्यंत आले. तेव्हा कागदपत्रांची बॅग व पैसे सीटवर नव्हती. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पाेलिसांचे पथक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज गोळा करत आहे. रेकॉर्डवरील बॅग लिफ्टिंग करणारे, इतर गुन्हेगारांचा शाेध सुरू असल्याचे उपनिरीक्षक प्रमोद देवकते यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.