आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:एकाच दिवशी 850 जणांचे रक्तदान

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘जगातील प्रत्येक वस्तू तंत्रज्ञानाने तयार करता येऊ शकते. रक्त मात्र तयार करता येऊ शकत नाही. तुमचे रक्तदान एखाद्याचे प्राण वाचवू शकते. त्यासारखे दुसरे पुण्य नाही,’ असे भावनिक आवाहन अल फरहान ग्रुपतर्फे ४० व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आले होते. त्याचे फलित म्हणजे ग्रुपतर्फे रविवारी शहरातील तीन ठिकाणी आयोजित शिबिरांत रात्री साडेनऊ वाजेपर्यंत ८५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

युनूस कॉलनी, पैठण गेट, सिल्क मिल्क कॉलनी येथे ही शिबिरे झाली. पुरुषांसह महिला रक्तदात्यांचा सहभागही लक्षणीय होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी येथील रक्तपेढी, लोकमान्य ब्लड बँक, दत्ताजी भाले ब्लड बँक येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी रक्त संकलन केले.शहरातील विविध भागांमध्ये बॅनर लावण्यात आले होते.

खासदार इम्तियाज जलील यांच्यासह डॉक्टर, उलेमा (धर्मगुरू) यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन केले होते.जगात कोणतीही वस्तू तयार करता येऊ शकते. परंतु रक्त मात्र तयार करता येऊ शकत नाही. त्यामुळे मानवतेसाठी रक्तदान करा असे आवाहन करणाऱ्या विविध ४० व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्या होत्या. तसेच १५ दिवसांपासून कॉर्नर मीटिंगसुद्धा घेण्यात आल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...