आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कदीर मौलाना यांच्या मुलाच्या लग्नात बुधवारी रात्री जेवण केल्यानंतर पाहुण्यांना उलटी, जुलाबांचा त्रास झाला. त्यामुळे घाटीत २२, एमजीएम रुग्णालयात ५४ तर सहारा हॉस्पिटलमध्ये १२ जणांवर उपचार करण्यातआले.
रोशन गेट परिसरात झालेल्या कार्यक्रमात जेवण केल्यानंतर रात्री बारानंतर लोकांना त्रास होण्यास सुरुवात झाली. उलटी, मळमळ आणि जुलाबांचा त्रास हाेत असल्याने लाेकांनी जवळचे हॉस्पिटल गाठले. घाटीच्या मेडिसिन विभागाच्या प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले, २२ रुग्ण रात्री दोन वाजता दाखल झाले. २१ जणांवर उपचार करून त्यांना घरी पाठवले.
एकाला अॅडमिट केले. त्यालाही गुरुवारी दुपारी सोडले. या लोकांना उलटी आणि जुलाबांचा त्रास होता. घटनेचे गांभीर्यआेळखूनआम्ही आपत्कालीन व्यवस्था तयार ठेवली होती. एमजीएमचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच.आर. राघवन म्हणाले,आमच्याकडे ५२ रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी १४ जणांना भरती केले. सकाळी सात जणांना डिस्चार्ज दिला. या रुग्णांना उलटी, जुलाब, पोटदुखीचा त्रास हाेता. तर सहारा हॉस्पिटलमध्ये रात्री एक वाजता १२ लोक आले होते.
नेमके कारण माहीत नाही
कदीर माैलाना म्हणाले, लग्नात माेठ्या संख्येने लाेकआले हाेते. मात्र, जेवणानंतर लोकांना त्रास नेमका कशामुळे झाला हे मला माहीत नाही. आम्ही त्याची माहिती घेत आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.