आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:गंगापूर तालुक्यातील 262 गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी 888 कोटी ; सौरऊर्जेने वीज बिलाचा खर्चही वाचणार

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जल जीवन मिशनअंतर्गत गंगापूर तालुक्यातील २६२ गावांना नळाद्वारे पाणीपुरवठ्यासाठी ८८८ कोटीची योजना राज्य सरकारने मंजूर केली आहे. या योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार आहे, राज्यात प्रथमच असा प्रयोग होत आहे, अशी माहिती आमदार प्रशांत बंब यांनी दिली. शाश्वत पाणीस्रोतातून होणाऱ्या या योजनेसाठी सौरऊर्जेचा वापर करण्यात येणार असल्याने वीज बिलाचा खर्च वाचेल. या कामाच्या निविदा मंजूर झाल्या असून महिनाभरात काम सुरू होईल, असा दावाही बंब यांनी केला. गंगापूर तालुक्यातील ग्रामीण भागाचे एकूण क्षेत्रफळ १२५३ कि.मी. आहे. क्षेत्रफळ जास्त असल्याने योजनेच्या सर्वेक्षणाला प्रदीर्घ कालावधी लागेल ही बाब विचारात घेऊन ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. टंडन अर्बन सोल्युशन्स ही मुंबईची कंपनी ३० दिवसांत सर्वेक्षण करेल. सुमारे दीड कोटी रुपये किमतीचा ड्रोन सर्वेक्षणासाठी वापरला जाईल. पोलिस अधीक्षकांच्या परवानगीने तो उडवला जाईल. २०५५ पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करून ही योजना तयारी करण्यात आली आहे. यात १० नवीन जलकुंभ, १२ संतुलन टाक्या तयार करून अंमळनेर येथे पंप हाऊस उभारले जाणार आहेत. वीज देयक कमी असेल, योजनेचे नावही बदलले : योजनेसाठी ६०० अश्वशक्तीच्या दोन मोटारी एकाच वेळी काम करतील. ८० टक्के सौरऊर्जा तर २० टक्के वीज असा वापर असेल. ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचे आता गंगापूर उपसा सिंचना योजना असे नामकरण केले आहे. या योजनेतून १.९ अब्ज घनफूट पाणी वापरण्यास परवानगी मिळाली, असे बंब म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...