आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:आयटीआयचा वसतीगृहाचा 89 लाखांचा निधी गेला माघारी; अधिकाऱ्यांकडून तांत्रिक अडचणीचे कारण समोर

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेस्टेशन जवळील मुलांसाठी असलेल्या औरंगाबाद आयटीआय वसतीगृहाचा 89 लाख रुपयांचा निधी खर्च न झाल्याने परत गेला आहे. हलगर्जीपणामुळे निधी गेला असतांना आता मात्र तांत्रिक अडचणींचे कारण पुढे केले जात आहे. यामुळे गेल्या दहा -पंधरा वर्षापासून सुविधांच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थी वसतीगृहाला आता पुन्हा निधीसाठी वाट पहावी लागणार आहे.

शहरातील रेल्वेस्टेशन परिसरात असलेल्या औरंगाबाद आयटीआयमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. रोजगारासह स्वयंरोजगाराची हमी असल्याने विद्यार्थ्यांसह पालकही आयटीआयला पसंती दर्शवतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मात्र राहण्यासाठी वसतीगृहाचा आधार असतो. या आयटीआयमध्ये एकूण 1951 विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. तर वसतीगृहाची क्षमता 300 आहे. मात्र सद्यस्थितीत केवळ 31 विद्यार्थीच वसतीगृहात रहात आहेत. ज्यांची कौटुंबिक स्थिती हालाखीजी आहे. शहरापासून गावाचे अंतर जास्त आहे. अशा गरजू आयटीआयमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना यात प्रवेश दिला जातो. हजार रुपये डिपॉजिट आणि दोन वर्षाचे बाराशे रुपये शुल्क या वसतीगृहासाठी विद्यार्थ्यांना भरावे लागते.

गेली दोन वर्ष कोरानात गेली. त्यापूर्वीच्या दहा-बारा वर्षात सुविधांचा अभाव आणि वसतीगृहाची झालेली दुरावस्ता, सुक्षेचे प्रश्न यामुळे वसतीगृहात विद्यार्थी रहात नसे. वारंवार विद्यार्थ्यांसाठी वसतीहात सुधारणा कराव्यात यासाठी मागणीही करण्यात आली होती. जिल्हा वार्षिक नियोजनातून आयटीआयला निधी दिला जातो. तर दुरुस्तीसाठीचे काम हे पीडब्ल्यूडी बांधकाम विभागांतर्गत केले जाते.

यासाठी ईटेंडरिंग प्रक्रिया केली जाते. आयटीआयला जिल्हा नियोजनातून 89 लाख रुपये मिळाले होते. परंतु ई-टेंडरिंगमधील तांत्रिक अडचणीमुळे तो पैसा खर्चच झाला नाही. त्यामुळे मिळालेला हा 89 लाख रुपयांचा निधी परत गेला आहे. आता पुन्हा निधी मिळवण्यासाठीचा प्रस्ताव केला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

लेखाशीर्ष अनुदान स्वंतत्रची मागणी

दरम्यान डीपीडीसी आणि जिल्हा वार्षिक नियोजनातून जो निधी दिला जातो.तो नवीन इमारत त्वरीत मिळतो. परंतु मेंटेनन्सच्या खर्चासाठी तरतुद होत नाही. त्यामुळे लेखाशीर्षसाठी स्वतंत्र अनुदान असायला हवे. अशी मागणी शासनस्तरावर करण्यात आली आहे.

आयटीआय उपप्राचार्य एस.पी.नागरे म्हणाले की, आयटीआयला 89 लाखांचा निधी मंजूर झाला होता. परंतु खर्च न झाल्याने आणि तांत्रिक अडचणी ई-टेंडरिंग प्रक्रियेत आल्यामुळे निधी परत गेला आहे. तो परत मिळावा यासाठी मागणी केली जाणार आहे. दरम्यान गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना वसतीगृहात सुविधा मिळावी यासाठी 50 लाख रुपये खर्च करुन फर्निचर करण्यात आलेे आहे. तसेच आयटीआयमधील सेवानिृत्त कर्मचारी संस्थेतूनही विद्यार्थ्यांना मदत केली जाते.