आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेल्वेस्टेशनजवळील मुलांच्या शासकीय आयटीआय वसतिगृहाचा ८९ लाख रुपयांचा निधी खर्च न झाल्याने परत गेला आहे. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा निधी परत गेला असताना कारण मात्र तांत्रिक अडचणींचे पुढे केले जात आहे. यामुळे गेल्या दहा -पंधरा वर्षांपासून सुविधांच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थी वसतिगृहाला आता पुन्हा निधीसाठी वाट पाहावी लागणार आहे. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या वसतिगृहाचा मोठा आधार आहे. आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांना यात प्रवेश दिला जातो.
हजार रुपये डिपॉझिट आणि दोन वर्षांचे बाराशे रुपये शुल्क एवढ्या नाममात्र शुल्कावर या ठिकाणी विद्यार्थ्यांची राहाण्याची सोय होते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे या वसतिगृहाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथे सुधारणा कराव्यात, अशी वारंवार मागणी ते करत आहेत. या वसतिगृहासाठी विद्यार्थ्यांना शुल्क भरावे लागते. मागील दोन वर्षे कोरोनात गेली. त्यापूर्वीच्या दहा-बारा वर्षांत सुविधांचा अभाव आणि वसतिगृहाची झालेली दुरवस्था, सुरक्षेचे प्रश्न यामुळे वसतिगृहात विद्यार्थी राहत नसत. वसतिगृहात सुधारणा कराव्यात, अशी मागणी वारंवार करण्यात आली होती.
निधी खर्च न होता गेला परत या आयटीआय वसतिगृहाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक नियोजनातून ८९ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र ई-टेंडरिंग प्रक्रियेत तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने तो निधी खर्च न होता परत गेला आहे. आता हा निधी पुन्हा मिळवण्यासाठी नव्याने प्रस्ताव दाखल करावा लागणार आहे. जिल्हा वार्षिक नियोजनातून जो निधी दिला जातो, तो त्वरित मिळतो. परंतु देखभालीच्या खर्चासाठी तरतूद नाही. त्यामुळे लेखाशीर्षासाठी स्वतंत्र अनुदान असायला हवे, अशी मागणी शासनस्तरावर करण्यात आली आहे.
निधीसाठी मागणी करणार आयटीआयला ८९ लाखांचा निधी मंजूर झाला होता. परंतु खर्च न झाल्याने आणि तांत्रिक अडचणी ई-टेंडरिंग प्रक्रियेत आल्यामुळे निधी परत गेला आहे. तो परत मिळावा यासाठी मागणी केली जाणार आहे. दरम्यान, गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना वसतिगृहात सुविधा मिळावी यासाठी ५० लाख रुपये खर्च करून फर्निचर करण्यात आलेे आहे. तसेच आयटीआयमधील सेवानिवृत्त कर्मचारी संस्थेतूनही विद्यार्थ्यांना मदत केली जाते. - एस.पी.नागरे उपप्राचार्य आयटीआय
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.