आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हे शाखेकडून अट्टल दुचाकी चोर अटकेत:5 महिन्यांत चोरल्या 9 दुचाकी; सहा वर्षांत 12 वेळेस अटक

छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या सहा वर्षांत १२ वेळेस अटक होऊनही जामिनावर सुटताच मंदिर, बारसमोरून सर्रास दुचाकी चोरणारा अट्टल गुन्हेगार शिवाजी भिकनराव चव्हाण (५०, रा. हिमायतबाग) पुन्हा गुन्हे शाखेच्या हाती लागला. चोरलेली दुचाकी त्याच्या ठरलेल्या मैदानावर सोडून जात असतानाच त्याला पकडले. त्या वेळी त्याच मैदानाच्या चार दिशांना अशाच दुचाकी चोरल्यानंतर वापरून सोडून दिलेल्या तब्बल नऊ दुचाकी पाेलिसांना आढळून आल्या. त्या सर्व जप्त करून त्याला अटक केली.

उपनिरीक्षक कल्याण शेळके पथकासह शनिवारी गस्तीवर हाेते. एक व्यक्ती गेल्या काही महिन्यांत छत्रपतीनगरमधील एका मैदानावर सातत्याने दुचाकी सोडून पुन्हा घेऊन जात असल्याची त्यांना त्या वेळी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. शेळके यांनी अंमलदार राजेंद्र साळुंके, शेख हबीब, विजय निकम यांनी सापळा रचला. शिवाजी दुचाकीवरून येत असतानाच त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याच्या ताब्यातील दुचाकीची तपासणी केली असता ती चोरीची निघाली.

मंदिर, बारसमोरील लक्ष्य मंदिर, बारसमोर उभ्या दुचाकी शिवाजी सहज लंपास करतो. दिवसा मंडप व्यावसायिकाकडे काम करून नंतर फावल्या वेळेत दुचाकी चोरतो. परंतु, त्या न विकता मैदानावर, निर्मनुष्य परिसरात सोडून वाटेल तेव्हा वापरत असे. त्याच्यावर आतापर्यंत सिडको, छावणी, एमआयडीसी वाळूज, सातारा, बेगमपुरा ठाण्यांत १२ गुन्हे दाखल आहे.

बातम्या आणखी आहेत...