आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर घर तिरंगा’ अभियान:जिल्ह्यातील 9 लाख घरांना मिळणार 29 रुपयांत पॉलिस्टरचा तिरंगी झेंडा

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात येत आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात साडेपाच आणि औरंगाबाद शहरातील साडेतीन लाख घरांना २९ रुपयांत तिरंगी ध्वज मिळणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी (१ ऑगस्ट) दिली.

ते म्हणाले की, १३ ते १५ ऑगस्टदरम्यान घरोघरी तिरंगा लावण्याचे अभियान आहे. यात घरावर लावण्यात येणाऱ्या झेंड्यांसाठी वेळेची कुठलीही नियमावली असणार नाही. मात्र, राष्ट्रीय ध्वजाचा अपमान होणार नाही याची काळजी लोकांनी घेणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी सांगितले की, अंकित कॉटेज उद्योगाला तीन बाय दोन फूट आकाराचा पाॅलिस्टरचा झेंडा तयार करण्याचे कंत्राट देण्यात आले. ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महापालिकेमार्फत झेंडे लोकांना उपलब्ध होतील. रोख २९ रुपये दिल्यावर झेंडा मिळेल. या मोहिमेतील पहिला झेंडा सोमवारी दुपारी तिसगावचे उपसरपंच नागेश कुठारे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...