आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहवाल:गोवरची आणखी 9 संशयित बालके ; भवानीनगर भागात संक्रमण झाल्याचे जाहीर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गोवरच्या साथीची ५ डिसेंबर रोजी आणखी ९ संशयित बालके आढळून आली. चिकलठाणा, नेहरूनगर, विजयनगरपाठोपाठ सोमवारी बायजीपुरा, भवानीनगर भागात गोवरचा उद्रेक झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे संसर्ग होणाऱ्या भागाची संख्या पाचवर पोहोचली आहे.

चिकलठाणा, नेहरूनगर, बायजीपुरा, विजयनगर, गांधीनगर, नक्षत्रवाडी, नारेगाव, मिसारवाडी, भीमनगर, सातारा, बन्सीलालनगर, भवानीनगर, जयभवानीनगर या भागात गाेवरची साथ झपाट्याने पसरत असल्याने आतापर्यंत ११४ संशयित सापडले आहेत. रविवारपर्यंत संशयित बालकांची संख्या १०५ वर पोहोचली होती. त्यात सोमवारी ९ बालकांची भर पडली. गेल्या तीन दिवसांत एकाही बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.

संशयित बालकांचे घेतले नमुने : मनपाची आरोग्य यंत्रणा शहरात सर्वत्र सर्वेक्षण करत आहे. आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन चौकशी करत आहेत. त्यातच सोमवारी आणखी ९ संशयित बालके आढळून आली आहेत. या बालकांच्या रक्ताचे नमुने मुंबई येथे हाफकिन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.

महापालिका लसीकरणावर भर देणार गोवर नियंत्रणात आणण्यासाठी सोमवारी चिकलठाणा, नेहरूनगर, विजयनगर, नक्षत्रवाडी, जयभवानीनगरात ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील १७७ बालकांचे लसीकरण केले. तसेच एमआर-१च्या ३८ आणि एमआर-२ च्या ३३ बालकांचे लसीकरण केले. या वेळी मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला भामरे, डॉ. संध्या नलगीरकर, डॉ. बाळकृष्ण राठोडकर, डॉ. मेघा जोगदंड, डाॅ. अर्चना राणे, डॉ. सोनी यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण केले.

बातम्या आणखी आहेत...