आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिग्नलवरील डाव्या बाजू मोकळ्या असाव्यात, यासाठी नागरिकांना शिस्त हवी, एमएसईबीचे खांब काढावेत, खड्डे बजुवावेत अादी समस्यांचे जालना रोडवरील ९ ठिकाणचे गाऱ्हाणे संघटनांनी मिळून पोलिस आयुक्तांसमोर मांडले. या वेळी वाहतुकीच्या ९० टक्के समस्या सुशिक्षित नागरिक नियम पाळत नाहीत म्हणून निर्माण होतात, अशी टिप्पणी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी संघटनाच्या प्रश्नांवर केली.
औरंगाबाद विमानतळ ते क्रांती चौकातील विविध चौक आणि सिग्नल्सवरील समस्यांबद्दल सीसीटीव्हीवर प्रत्यक्ष पाहून चर्चा केली. कोणत्या ठिकाणी काय बदल केल्यास वाहतूक सुरळीत होऊन सर्वांचा वेळ वाचेल, याविषयी दोन्ही बाजूंनी सकारात्मक चर्चा झाली. राँग साइड, ट्रिपल सीट, लाल दिवा लागलेला असतानादेखील गाड्या पळवणे, डाव्या बाजूला वाहने उभी करणे, डाव्या बाजूनेही ओव्हरटेक करणे अादी प्रकार थांबल्यास निम्म्या समस्या संपतील, असेही डॉ. गुप्ता म्हणाले. या वेळी सीएमआयएचे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू, मसिआचे अध्यक्ष किरण पाटील, औरंगाबाद फर्स्टचे माजी अध्यक्ष प्रीतिश चटर्जी, कार्यकारी सचिव हेमंत लांडगे, सीआयआयचे प्रादेशिक संचालक अमोल मोहिते, टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सीए जयंत जोशी उपस्थित होते. याप्रसंगी क्रेडाई, बिमटा संघटनांनी डाॅ. गुप्ता यांना निवेदने दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.