आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काेराेना व्हायरसचा अाराेग्यावरील जीवघेणा हल्ला अाणि लाॅकडाऊनच्या नाेकरीवर पडत असलेल्या दूरगामी परिणामामुळे सध्या नाेकरदार अाणि विद्यार्थ्यांची झाेपच उडाली अाहे. याशिवाय अनेक व्यावसायिक अाणि महिला वर्गही मानसिकदृष्ट्या अडचणीत सापडला अाहे. याच संकटातून स्वत:ला सावरण्यासाठी अाता याेगाचा अाधार घेतला जात अाहे. यासाठी अाॅनलाइनच्या माध्यमातून मार्गदर्शन घेत अाहेत. यातूनच अाता मागील अडीच महिन्यांच्या लाॅकडाऊनच्या कालावधीत ८० टक्के जणांनी याेग अभ्यासाला पसंती दर्शवली अाहे. यामध्ये सर्वाधिक माेठी मागणी याेगनिद्रेच्या मार्गदर्शन अाणि मार्गदर्शक व्हिडिअाेला येत अाहे. याशिवाय ध्यान, प्राणायाम अाणि याेगासनाबाबतही माेठ्या संख्येत मार्गदर्शन घेतले जात अाहे. दिवसाकाठी ४० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज हे याेगनिद्रा, ध्यान, प्राणायाम व याेगासनावर मार्गदर्शन करणाऱ्या व्हिडिअाेला मिळत अाहेत. एकूणच मानसिकदृष्ट्या अडचणीत असलेल्यांसाठी याेगाचा माेठा अाधार मिळत अाहे.
बाटली दूर, योगच बेस्ट पर्याय
मद्यप्राशन, तंबाखू आणि सिगारेट ओढून मानसिक ताण तणाव दूर करण्याचा फॉर्म्युला वापराला जातो. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे या नशेच्या वस्तू मिळत नाहीत. त्यामुळे आता मनातील नकारात्मक विचारांचे चक्र थांबवण्यासाठी आणि मानसिक ताण दूर करण्यासाठी योगा हाच उत्तम पर्याय जवळपास ९० टक्के लोकांनी निवडला आहे. घरीच राहून कोणत्याही खर्चाशिवाय हा योगा करता येतो. त्यामुळेच मन:शांतीसाठी योगा आणि योगासने केली जात आहेत. यात नियमित सूर्यनमस्कारापासून भ्रामरी आसन, प्राणायाम, कपालभाती, भस्त्रिका, त्राटकसारख्या साधनेला पसंती दिली जात आहे.
हास्ययोगने मानसिक शांती
नोकरीमधील अनिश्चितता व ठप्प व्यवसायाने अनेक जण तणावात आहेत. त्यामुळे चिडचिड होत आहे. मात्र, यावर हास्ययोग गुणकारी ठरत आहे. हास्यामुळे कर्मेंद्रिये यथायोग्य, पूर्ण सक्रिय व स्फूर्तीसंपन्न होण्यास मदत होते. त नियमित हास्ययोगाने स्नायुसंस्था, रक्तदाब व श्वसनक्रिया नियंत्रित राहते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती व एकाग्रता वाढीस मदत हाेते.
योग हाच उत्तम पर्याय
अवघ्या जगावर कोरोनामुळे संकट येऊन धडकले आहे. औषधी, आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या प्रत्येक जण होरपळला जात आहे. त्यामुळे आता योग हाच सर्वांसाठी उत्तम असा पर्याय आहे. नियमित योगाभ्यासातून आपण मानसिकदृष्ट्या सक्षम राहू शकतो. नकारात्मक विचारांना नष्ट करण्यासाठी आणि मनावरील ताण दूर करण्यासाठी योग हा उत्तम पर्याय आहे. या काळातील युवक योगाकडे जोडला जात असल्याचा आम्हाला आनंद आहे. - सतीश मोहगावकर, तांत्रिक संचालक, बृहन्महाराष्ट्र योग परिषद
सकारात्मक विचार करा
काेणतीही वेळ ही कायमस्वरूपी राहत नाही. यात बदल होत असतो. त्यामुळे सकारात्मक विचारातून याकडे पाहण्याची गरज आहे. हे संकट नष्ट झाल्यानंतर प्रचंड वेगाने आपण उभारी घेऊ शकतो. ही क्षमता प्रत्येकामध्ये आहे. याचा फक्त सकारात्मक दृष्टीने विचार केला जावा. त्यामुळे निश्चितच प्रगतीच्या वाटा खुल्या होतील. नकारात्मक विचारांना तिलांजली देऊन आजचा दिवस आनंदात घालवा. - रीना, डायरेक्टर सोहम योगसाधना, ठाणे.
लॉकडाऊनमुळे योगाला चालना
योगा हा भारतीयांसाठी परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. ऐतिहासिक पुराणांमध्ये योगाच्या महत्त्वपूर्ण माहितीची नोंद झालेली आहे. त्यामुळे योगाच्या प्रसारासाठी विविध संस्था कार्यरत आहेत. मात्र, मागील दोन महिन्यांत झालेल्या लॉकडाऊनमुळे योगाच्या प्रसाराला मोठा वेग आला. त्यामुळे दिवसाकाठी ४० ते ५० लाख जण योगाभ्यास करत असल्याचे दिसत आहे. या ७० दिवसांत ९० टक्के वेगाने योगाचा प्रसार झाल्याने आनंदी असल्याचे बृहन्महाराष्ट्र योग परिषदेच्या वतीने कळवण्यात आले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.