आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संविधान दिन:पर्यटन संचालनालयाच्या सहलीत दोन दिवसांत 92 जण सहभागी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संविधान दिनानिमित्त पर्यटन संचालनालयातर्फे मोफत सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दोन दिवसांत शहरातील ९२ जणांनी या सहलीचा आनंद घेतला.शहरातील पर्यटनस्थळांची माहिती व्हावी, पर्यटकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने तसेच संविधानाचे महत्त्व कळावे यासाठी ही मोफत सहल आयोजित करण्यात आली आहे. ३ डिसेंबरला ५०, तर ४ डिसेंबरला ४२ पर्यटकांनी या सहलीचा आनंद घेतला. महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक बी. एन. पाटील यांच्या उपस्थितीत ३ डिसेंबरला मिलिंद कॉलेज येथून या उपक्रमाची सुरुवात झाली. वेरूळ लेणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद लेणी, मिलिंद कॉलेज असा या सहलीचा मार्ग होता. किरण गाडेकर व अपर्णा गायकवाड यांनी गाईड म्हणून पर्यटकांना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक विजय जाधव, उपअभियंता अभिषेक मुदीराज, सपना इंदापुरे यांनी सहलीचे संयोजन केले.

बातम्या आणखी आहेत...