आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 बँकांचा पुढाकार:23 हजार लाभार्थींना 925 कोटींचे कर्ज, 50 हजारांवर रोजगाराच्या संधी

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र बँकर्स समितीची १५६ वी राज्यस्तरीय कर्ज मेळावा बैठक सोमवारी संत एकनाथ रंगमंदिरात पार पडली. १८ राष्ट्रीयीकृत व इतर बँकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील २३ हजार लाभार्थींना ९२५ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. या माध्यमातून ५० हजार जणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, असे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी शहरात प्रथमच राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीचे आयोजन केले. हाेते. या वेळी दहा हजार रुपयांपासून ते अकरा कोटी ७३ लाख रुपयांपर्यंत कर्जाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात प्रतीकात्मक धनादेश दिले. लाभार्थींना संबंधित बँकेच्या शाखेतून दोन दिवसांत मंजूर कर्जाची रक्कम मिळेल. महिनाभरात विविध घटकांच्या कर्जाचे प्रस्ताव तयार करून त्यास मंजुरी देण्यात आली. डॉ. कराड म्हणाले, सर्व बँका नफ्यात आहेत. नियमानुसारच त्यांनी कर्ज मंजूर केले. रिस्ट्रक्चर आणि ओटीएस नियमाप्रमाणे होते. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून १ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज दिले जाते, तर तीन लाखांपर्यंत कर्ज देताना सातबारावर बोजा चढवला जातो. मनपा हद्दीतून दहा हजार रुपयांच्या कर्जासाठी दहा हजार अर्ज आले होते. त्यातील सात हजार नागरिकांना कर्ज दिले. अडीच हजार नागरिकांच्या कर्जाचे प्रस्ताव स्टेट बँक ऑफ इंडियाकडे प्रलंबित आहेत.

राज्यात २,९५२ कोटींचे कर्ज मंजूर
राज्यात २,९५२ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. लाभार्थी संख्या ७८,८२४ इतकी आहे. यात २३,२९६ शेतकऱ्यांना ६,२०८ कोटींचे कृषी कर्ज वितरित करण्यात आले. लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगांत काम करणाऱ्या ६,२०८ उद्योजकांना १,३८६ कोटी रुपये मंजूर केले. रिटेल क्षेत्रातील ९,४०९ नागरिकांना ९८४ कोटी रुपये तर इतर ३४,९११ जणांना २४५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यात भाजी विक्रेता, शेतकरी, कामगार, रोजंदारी करणारा मजूर, उद्योजक, महिला बचत गट, विद्यार्थी (शिक्षण कर्ज) आदींचा समावेश आहे.

जिल्ह्यातील ४० महिला बचत गटांतील ४०० जणींना कर्ज वाटप केले. महिला बचत गट वेळेवर कर्जाची परतफेड करत असून त्यांच्या कर्जाचा एनपीए ३ टक्के इतका अत्यल्प असल्याचे बँकेच्या वतीने सांगण्यात आले. कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील सावित्री महिला बचत गटाला कापड दुकानासाठी महाराष्ट्र बँकेने १० लाख मंजूर केले. खुलताबादच्या सालुखेडा येथील दहा महिलांच्या गटाला बकऱ्यांसाठी एक लाख मंजूर केले.

एका मुलीला १९ लाखांचे शिक्षण कर्ज
सानिया मोटर्सला अकरा कोटी, एलोरा सीड्सला ११ कोटी ७५ लाख तर जे. के. रिफायनरीला १२ कोटी कर्ज दिले. शिक्षणासाठी विदेशात जाणाऱ्या प्रांजली हुसे हिला १९ लाखांचे शिक्षण कर्ज मंजूर करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...