आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाचणी:पोलिस होण्याच्या रांगेत 930 वकील, डाॅक्टर, एमई, बीटेक, एमएस्सी उमेदवार

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलिस दलाच्या पोलिस शिपाई पदासाठी तीन दिवसांपूर्वी प्रारंभ झाला. यात ३९ जागांसाठी ५ हजार ७२५ उमेदवारांनी अर्ज सादर केला असून यात दीड हजार तरुणी आहेत. शिपाई होण्यासाठी फक्त १२ वी पासची अट असली तरी ९३० बीएचएमएस, एमई, बीई, बीटेक, एलएलएम, एमएस्सी पास उमेदवार स्पर्धेत आहेत.

२ जानेवारीपासून पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या नियंत्रणात भरती चाचणी सुरू झाली. यंदा पारदर्शक प्रक्रियेसाठी उमेदवारांची नोंदणी बायोमेट्रिक स्कॅनने होत आहे. आरएफआयडी प्रणालीने उमेदवारांना चेस्ट क्रमांकावर बारकोड दिला जात आहे. त्यावरून त्यांची १००, १६०० मीटर धावण्याचा अचूक वेळ नोंदवून गुणांकन केले जात आहे. सहा उपविभागीय अधिकारी, १० पाेलिस निरीक्षक, ९ सहायक निरीक्षक, १७ उपनिरीक्षक, १३५ अंमलदार व १८ व्हिडिओग्राफर यासाठी कार्यरत असून संपूर्ण परिसरावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. भरती प्रक्रियेत कुणाच्याही भूलथापांना, प्रलोभनांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक कलवानिया यांनी केले आहे.

तीन दिवसांत १९५ अपात्र १० जानेवारीपर्यंत भरती चालेल. शेवटचे दोन दिवस तरुणींसाठी आहेत. तीन दिवसांत २१०० उमेदवारांचा बोलावण्यात आले होते. त्यापैकी ११०२ आले. अपूर्ण शैक्षणिक कागदपत्रे, उंची व छाती यामुळे १९५ अपात्र ठरले.

बातम्या आणखी आहेत...