आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलन:94 वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन सप्टेंबरअखेर नाशिकमध्ये शक्य, साहित्य महामंडळाच्या बैठकीनंतर जाहीर केली भूमिका

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नियोजनानंतर स्थगित करण्यात आले होते, परंतु आता हळूहळू परिस्थिती सुधारत असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर सप्टेंबर अथवा नोव्हेंबरअखेरीस साहित्य संमेलन घेण्यात येऊ शकते. नाशिक येथील निमंत्रितांनी संमेलन घेण्याबाबत तयारी दर्शवलेली आहेच. त्यामुळे त्याबाबत विचारमंथन सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. साहित्य संमेलनाबाबत तसेच पुरस्कारांबाबत चर्चा झाल्याचे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले. रविवारी साहित्य महामंडळाची बैठक मराठवाडा साहित्य परिषदेत पार पडली. या वेळी नाशिक येथे संमेलन होणार असल्याने तेथील प्रतिनिधी, कार्यवाह दादा गोरे, डॉ. रामचंद्र काळुंखे यांच्यासह इतर सदस्य या बैठकीस उपस्थित होते.

आता परिस्थितीत सुधारणा झाल्यास आणि शासनाने मान्यता दिल्यावर सप्टेंबर अथवा नोव्हेंबरअखेरीस ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याची शक्यता आहे. मागील बैठकीचे इतिवृत्त कायम ठेवणे, आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी संमेलन मार्गदर्शन समितीच नियुक्ती करणे आणि २०२१ च्या राम शेवाळकर पुरस्कारासाठी निवड झालेल्यांना पुरस्कार प्रदान करण्याबाबत शेवाळकर यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करून समितीची रचना करणे आदींबाबत चर्चा झाल्याचे ठाले पाटील यांनी सांगितले.

... आणि चर्चेला पूर्णविराम
मागील वेळी शरद पवार यांच्या सहस्र चंद्रदर्शन सोहळा यावर केलेल्या वक्तव्यामुळे ठाले पाटील अडचणीत आले होते, तर कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेले संमेलन पुन्हा नाशिकलाच होईल की अन्य ठिकाणी याबाबत चर्चा सुरू झाली होती. परंतु ३ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत नाशिक येथेच संमेलन होणार असल्याचे ठाले पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...