आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इयत्ता आठवीसाठी एनएमएस शिष्यवृत्ती परीक्षा:पहिल्या पेपरसाठी 95.02 टक्के तर दुसऱ्या पेपरसाठी 94.97 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांच्या मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी (इयत्ता आठवीसाठी) शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) रविवारी (ता. 19) शहरातील 14 केंद्रांवर घेण्यात आली. परीक्षेत पहिल्या पेपरसाठी 95.02 टक्के तर दुसऱ्या पेपरसाठी 94.97 टक्के विद्यार्थी उपस्थित होते.

या परीक्षेत शहरातील औरंगपुरा परिसरातील परीक्षा केंद्र असलेल्या शारदा मंदिर कन्या प्रशालेत अंधारी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी साक्षी संतोष उबाळे या विद्यार्थीनीचा अपघातात पाय दुखावला गेला होता. या विद्यार्थीनीसाठी केंद्रावर बेडची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापिका सविता मुळे यांनी दिली.

परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास त्यांना सहकार्य करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार सूचनांचे पालन करत आणि विद्यार्थीनीची स्थिती पाहून तिच्यासाठी बेडची व्यवस्था करण्यात आल्याचे उममुख्याध्यापिका वंदना रसाळ यांनी सांगितले.

औरंगाबाद शहरातील 14 केंद्रावरील 183 ब्लॉकमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी जिल्ह्याची एकूण क्षमता 4 हजार 392 इतकी होती. मात्र, यंदा या परीक्षेला एकूण 4 हजार 273 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात मराठी माध्यमासाठी 4 हजार 73, उर्दू माध्यमाचे 87, इंग्रजी माध्यमाचे 111 तर हिंदी माध्यमाचे 2 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.

सकाळच्या सत्रात झालेल्या मानसिक क्षमता चाचणी पेपरमध्ये 4 हजार 60 विद्यार्थी उपस्थित होते. तर 213 जण अनुपस्थित होते. एकूण 95.02 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर दुपारच्या सत्रात 4 हजार 58 विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी 215 जण अनुपस्थित होते. एकूण 94.97 विद्यार्थ्यांनी दुसरा पेपर दिला. अशी माहिती शिक्षण विस्तार अधिकारी जी.व्ही. चौरे यांनी दिली. तर परीक्षा सुरळीत पार पडल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांनी सांगितले. या परीक्षेसाठी बाळासाहेब चोपडे यांनी देखील काम पाहिले. सुरुवातीला ही परीक्षा नोव्हेंबर महिन्यात होणार होती. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही परीक्षा विद्यार्थी सुरक्षितता लक्षात घेता पुढे ढकलण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...