आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:गतवर्षीचा अपवाद वगळता 5 वर्षांत प्रथमच 96 % निकाल ; ग्रामीणमधून 1320 विद्यार्थी नापास

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील वर्षी बारावीच्या परीक्षा न घेता मूल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे टक्केवारीसह विद्यार्थ्यांच्या गुणांचाही फुगवटा वाढला होता. यंदा होम सेंटर असतानाही शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातून परीक्षा देणाऱ्या मुलांची संख्या अधिक होती. शहरात ७२६, तर ग्रामीण भागात १३२० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. औरंगाबाद शहराचा निकाल ९६.७०, तर ग्रामीणचा ९६.४१ टक्के लागला आहे. २०२१ च्या परीक्षेचा अपवाद वगळता औरंगाबाद जिल्ह्याचा प्रथमच ९० टक्क्यांपेक्षा जास्त (९६.४८) निकाल लागला आहे. २०१७ मध्ये ८९.७६, २०१८ मध्ये ८९.१५, २०१९ मध्ये ८९.२२ आणि २०२० मध्ये ८७.७६ अशी निकालाची टक्केवारी होती. २०२१ मध्ये कोरोना काळात बोर्डाच्या परीक्षाच झाल्या नाहीत. अंतर्गत मूल्यमापनावर विद्यार्थ्यांचा निकाल लावण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९९.५३ टक्के होता. पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १० जूनपासून : विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून अनुत्तीर्ण आणि श्रेणी सुधारसाठी तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया १० ते १७ जूनदरम्यान असेल. बँकेत चलनाद्वारे शुल्क भरण्याची मुदत १८ ते २१ जून, याद्या जमा करण्याची मुदत २२ जून आहे. गुणपडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज निकालानंतरच्या प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करता येतील. शुक्रवारपासून (१० जून) संपादित केलेल्या गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळाकडे http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येतील. त्याचप्रमाणे शाळा व ज्युनियर कॉलेजमध्येही अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणीसाठी १० ते २० जून, छायाप्रतींसाठी १० ते २९ जूनपर्यंत अर्ज करावेत. १४२ कॉपीबहाद्दरांवर कारवाई : बारावीच्या परीक्षेदरम्यान १४२ गैरप्रकार आढळले. त्यातील १३७ विद्यार्थ्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. गैरप्रकार करणाऱ्या १०५ विद्यार्थ्यांची संबंधित विषयाची संपादणूक रद्द करण्यात आली आहे, तर मोबाइलवरून प्रश्नपत्रिका व्हायरल केलेल्या एकास एक + पाच अशा सहा परीक्षांसाठी रस्टिकेट करण्यात आले आहे. ३१ परीक्षांर्थींचे निर्दोष निकाल जाहीर करण्यात आले. पाच विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

तालुकानिहाय निकाल औरंगाबाद ९६.७० टक्के, गंगापूर ९७.३८, कन्नड ९६.०३, खुलताबाद ९६.४०, पैठण ९६.४७, सिल्लोड ९६.८१, सोयगाव ९५.१०, वैजापूर ९५.४५ तर फुलंब्रीचा निकाल ९६.४१ टक्के लागला आहे.

शहर, ग्रामीण भागातील आकडेवारी शहर ग्रामीण परीक्षा देणारे २२०३३ ३६०९७ एकूण उत्तीर्ण २१३०७ ३४७७७ एकूण मुले १२०६९ २१९५४ एकूण मुली ९९६४ १४१४३ उत्तीर्ण मुले ११५८२ २१११८ उत्तीर्ण मुली ९७२५ १३६५९ अनुत्तीर्ण ७२६ १३२०

बातम्या आणखी आहेत...